मुंबई - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने विना कार्ड एटीएममधून पैसे काढण्याची सुविधा दिले आहे. है पैसे ग्राहकांना योनो कॅशमधून काढता येणार आहे.
एसबीआय योनो कॅशमधून पैसे काढण्याची सुविधा पुढील सहा महिन्यात देणार आहे. ही सुविधा ६० हजार एटीएममध्ये देण्यात येणार आहे. तसेच एसबीआयच्या योनो कॅश पॉईँटमध्येदेखील ही सुविधा असणार आहे. योनो ही एसबीआयची डिजीटल आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा आहे. पुढील २ वर्षात सर्व आर्थिक व्यवहार हे योनोच्या पद्धतीने होतील, असे एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार यांनी सांगितले.