ETV Bharat / business

गेल्या सहा वर्षात रुपयाचा नीचांक : डॉलरच्या तुलनेत ११३ पैशांनी गडगडला ; 'हे' आहे घसरणीचे कारण

अमेरिका व चीनमधील तणावामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. या दबावामुळे रुपयाच्या किमतीवर दबाव राहिल्याचे फॉरेक्स ट्रेडरने सांगितले.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Aug 5, 2019, 8:28 PM IST

मुंबई - गेल्या सहा वर्षात सर्वात अधिक आज रुपया कमकुवत झाला आहे. कारण डॉलरच्या तुलनेत रुपया ११३ पैशांनी गडगडला आहे. या घसरणीमुळे डॉलरच्या तुलनेत रुपया ७०.७३ वर स्थिरावला आहे.

चीन-अमेरिकामधील व्यापारी तणाव आणि विदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात भांडवली बाजारामधून निधी काढून घेतल्याने रुपया गडगडला आहे.

हे आहे रुपयाच्या घसरणीचे कारण-

  • अमेरिका व चीनमधील तणावामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. या दबावामुळे रुपयाच्या किमतीवर दबाव राहिल्याचे फॉरेक्स ट्रेडरने सांगितले.
  • एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख व्ही.के.शर्मा म्हणाले, युआनची २००८ नंतर प्रथमच डॉलरच्या तुलनेत ७ ने घसरण झाली आहे. यामुळे चीन व अमेरिकेमधील व्यापारी युद्ध नव्या टप्प्यावर आल्याचे स्पष्ट होत आहे.
  • आरबीआयची पतधोरण समिती ७ ऑगस्टला काय निर्णय घेते याकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष आहे. अर्थव्यवस्था मंदावली असताना आरबीआय २५ बेसिस पाँईटने रेपो दरात कपात करेल, अशी विविध क्षेत्रामधून अपेक्षा व्यक्त आहे.
  • केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू काश्मीरचा ३७० वे कलम रद्द केल्यानेही रुपयाची घसरण झाल्याचे ट्रेडरने सांगितले. या निर्णयामुळे जम्मू काश्मीर आणि लडाख हे स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश राहणार आहेत. विदेशी गुंतवणूकदार संस्थानी आज भांडवली बाजारामधून २ हजार १६ कोटी रुपये काढून घेतले आहेत.

दिवसाअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत ७०.७३ वर स्थिरावला. यापूर्वी ऑगस्ट २०१३ मध्ये एकाच दिवसात रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली होती.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.