नवी दिल्ली - रॉयल एन्फिल्डच्या एप्रिलपासून किमती वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या मालाचे दर वाढल्याने कंपनीकडून वाहनांच्या किमती वाढणार असल्याची शक्यता कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
रॉयल एन्फिल्ड ही आयशर मोटर्सच्या मालकीची कंपनी आहे. गेल्या सहा महिन्यात अनेकदा रॉयल एन्फिल्डची किंमत वाढविण्यात आली आहे. एप्रिलमध्ये वाहन उद्योगातील अनेकजण वाहनांच्या किमती वाढविणार आहेत. अशातच आम्ही वाहनांच्या किमती वाढवू शकतो, असे एनफिल्डचे सीईओ विनोद के. दसारी यांनी सांगितले.
हेही वाचा-प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दणका; पंतजली, कोकसह पेप्सीला कोट्यवधींचा दंड
किती दरवाढ होईल, असे विचारले असता एक अंकी टक्केवारीत वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे दसारी यांनी सांगितले. उत्पादनांच्या खर्चासह इतर कारणांनी इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणण्यात येणार नसल्याचे आयशरचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ लाल यांनी सांगितले.
हेही वाचा-रुपया वधारल्याचा परिणाम; सोन्याच्या दरात अंशत: घसरण