नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने स्टेट बँक ऑफ इंडियाला २ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. कर्ज देताना कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या कमिशनची माहिती दिली नसल्याने हा दंड ठोठावल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
आरबीआयच्या नियमानुसार बँकांना नियमांचे पालन करावे लागते. स्टेट बँकेने कर्ज वाटपावर बँक कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या कमिशनची माहिती आरबीयआयला सविस्तरपणे दिली नव्हती. हे बँकिंग नियमांचे उल्लंघन असल्याने आरबीआयने स्टेट बँकेवर कारवाई केली आहे.
हेही वाचा-देशाच्या निर्यातीत १ ते १४ मार्चदरम्यान १७ टक्क्यांची वाढ
स्टेट बँकेचे ३१ मार्च २०१७ ते ३१ मार्च ते २०१८ चे लेखापरीक्षण करण्यात आले. यामध्ये माहितीत त्रुटी आढळल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्यावरून दंड ठोठावल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
दरम्यान, आरबीआयकडून सातत्याने बँकांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात येतो. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास आरबीआयकडून बँकांवर दंड ठोठावण्यात येतो.