ETV Bharat / business

Reliance Jio : रिलायन्स जिओने बीएसएनएलला सर्वात मोठे फिक्स्ड लाइन ब्रॉडबँड प्रदाता म्हणून टाकले मागे - भारत संचार निगम लिमिटेड

मंगळवारी टेलिकॉम रेग्यूलेटर ट्रायने प्रसिद्द केलेल्या मासिक टेलिकॉम सबस्काइबरच्या अहवालाच्या माहितीनुसार रिलायन्स जिओने 20 वर्षे जुनी सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएलला या क्षेत्रातील सर्वोच्च सेवा प्रदाता (Jio leads the fixedline broadband segment) म्हणून मागे टाकले आहे.

Jio
Jio
author img

By

Published : Jan 19, 2022, 5:15 PM IST

नवी दिल्ली: रिलायन्स (Jio leads the fixedline broadband) सेवांच्या व्यावसायिक रोलआउटच्या जवळपास दोन वर्षांमध्ये या क्षेत्रातील सर्वोच्च सेवा प्रदाता म्हणून 20 वर्ष ओळख असलेल्या सरकारी दूरसंचार कंपनी BSNL ला मागे टाकले आहे. याबाबतची माहिती दूरसंचार नियामक ट्रायने मंगळवारी जारी केलेल्या मासिक टेलिकॉम ग्राहकांच्या अहवालाता दिली आहे. त्यानुसार जिओ आता 4.34 दशलक्ष सदस्यांसह फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड क्षेत्रात अव्वल स्थानी आहे.

जवळपास 20 वर्षाहून अधिककाळ आपल्या स्थापनेनंतर या क्षेत्रात राज्य-संचालित दूरसंचाराचे वर्चस्व होते. रिलायन्स जिओची फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड (Reliance Jio's fixed-line broadband) ग्राहकांची संख्या ऑक्टोबरमध्ये 4.2 दशलक्ष होती. त्यावरुन नोव्हेंबरमध्ये ती संख्या 4.34 दशलक्ष झाली. तसेच बीएसएनलच्या (Bharat Sanchar Nigam Limited) ग्राहकांची संख्या ही ऑक्टोबरमध्ये 4.72 दशलक्षावरुन घटून आता नोव्हेंबरमध्ये 4.3 दशलक्ष झाली आहे. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये भारतीय एअरटेल फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड ग्राकांची संख्या 4.08 दशलक्ष होती.

सप्टेंबर 2019 मध्ये जिओकडून आपली कमर्शियल फिक्स्ड-लाइन ब्रॉडबँड सेवा (Commercial fixed-line broadband service) सुरु करण्यात आली. जेव्हा जिओने सुरुवात केली, तेव्हा सप्टेंबर 2019 मध्ये बीएसएलएलचे 8.69 दशलक्ष वायर्ड ब्रॉडबँड ग्राहक होते. जे नोव्हेंबरमध्ये निम्याच्या खाली गेले आहेत. भारती एयरटेलच्या वायर्ड ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या सप्टेंबर 2019 मधील 2.41 दशलक्ष वरून नोव्हेंबर 2021 मध्ये जवळपास 70 टक्क्यांनी वाढली आणि त्यांचे ग्राहक संख्या 4.08 दशलक्ष झाली आहे. त्यामुळे लवकरच अशा वेगाने बीएसएलाही अशाच वाढीच्या वेगाने मागे टाकण्याची अपेक्षा आहे.

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (Telecom Regulatory Authority of India) च्या ग्राहकांच्या अहवालानुसार, देशातील ब्रॉडबँड ग्राहक ऑक्टोबरमध्ये 798.95 दशलक्ष वरून नोव्हेंबरमध्ये 801.6 दशलक्ष पर्यंत वाढले आहेत, रिलायन्स जिओने या विभागात आपली आघाडी कायम ठेवली आहे. नोव्हेंबर अखेरीस एकूण ब्रॉडबँड ग्राहकांमधील शीर्ष पाच सेवा प्रदात्यांचा बाजारातील हिस्सा 98.68 टक्के आहे, असे ट्रायने सांगितले आहे. नोव्हेंबरमध्ये रिलायन्स जिओच्या एकूण ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ४३२.९६ दशलक्ष इतकी होती. त्यानंतर भारती एअरटेलचे 210.10 दशलक्ष ब्रॉडबँड ग्राहक, VIL 122.40 दशलक्ष,बीएसएल 23.62 दशलक्ष आणि अटरिया कन्व्हर्जन्स ब्रॉडबँड ग्राहक 1.98 दशलक्ष होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.