नवी दिल्ली - मुंबईत निवासी गृहप्रकल्पांची नोंदणी नोव्हेंबरमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६७ टक्क्यांनी वाढली आहे. महाराष्ट्र सरकारने मुद्रांक शुल्कात कपात केल्याने नोव्हेंबरमध्ये ९,३०१ घरांची नोंदणी झाल्याचे नाईट फ्रँकने म्हटले आहे. हा घरांच्या नोंदणीतील नऊ वर्षातील उच्चांक आहे.
नोव्हेंबरमध्ये घरांच्या नोंदणीचे प्रमाण ऑक्टोबरच्या तुलनेत १७ टक्क्यांनी वाढले आहे. नाईट फ्रँक इंडियाचे सीएमडी शिशीर बैजल म्हणाले, की घरांच्या खरेदीवर लागू होणाऱ्या मुद्रांक शुल्कात कपात केल्याने घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, विकासकांकडून देण्यात येणाऱ्या सवलती, सणांच्या मुहुर्तावर खरेदीचे वाढलेले प्रमाण या कारणांनी नोव्हेंबरमध्ये घरांची विक्री वाढली आहे. राज्य सरकारने गृहक्षेत्रात विश्वास वाढविण्यासाठी सक्रियपणे पावले उचचल्याचेही त्यांनी म्हटले.
हेही वाचा-विना परवाना सार्वजनिक वायफाय बसविता येणार; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
राज्य सरकारने गृहविक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी मुद्रांक शुल्कात ३०० बेसिस पाँईटने कपात केली आहे. कल्पतरुचे व्यवस्थापकीय संचालक पराग मुनोत म्हणाले, की व्याजदर कमी केल्याने ग्राहकांमधील विश्वास वाढीला लागला आहे. घरखरेदीत ८ ते १० टक्के सवलत आहे. पहिल्यांदाच घरांच्या किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे स्थावर मालमत्ता क्षेत्रात गुंतवणुकीची चांगली संधी आहे.
हेही वाचा-पतमानांकनात सुधारणेचा येस बँकेला फायदा; शेअरच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ