ETV Bharat / business

'जनतेचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे'

author img

By

Published : Feb 12, 2020, 3:58 PM IST

Updated : Feb 12, 2020, 5:31 PM IST

राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, नियमन करणारी संस्था आरबीआयने बँकांच्या कारभारात मोठ्या प्रमाणात स्थिरता आणली आहे. नियामक संस्था म्हणून आरबीआयची भूमिका वाढविण्यात आली आहे. बँका या देशाच्या अर्थव्यवस्थेतील इकोसिस्टिमच्या आधार आहेत.

Ramnath Kovind
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

पुणे - सार्वजनिक पैशाचे संरक्षक म्हणून बँकांवर महत्वाची जबाबदारी आहे. जनतेचा बँकेवर असलेला विश्वास अबाधित ठेवण्यासाठी बँकांनी कायम प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्था अर्थात 'एनआयबीएम’ चा सुवर्णमहोत्सवी सोहळा राष्ट्रपती कोविंद यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

राष्ट्रपती कोविंद म्हणाले, बँका या आर्थिक व्यवस्थेच्या भरभराटीचे निदर्शक आहेत. बँकांनी आपल्या कार्यक्षमतेमुळे लोकांचा विश्वास आणि आदर मिळविला आहे. देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यामध्ये बँकांनी उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. स्वातंत्र्याच्या वेळी बँकिंग क्षेत्राला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. परंतु त्यानंतरच्या कालावधीत बँकिंग क्षेत्राने केलेली प्रगती समाधानकारक आहे.

एनआयबीएम सुवर्णमहोत्सवी सोहळा

हेही वाचा-महागाईचा भडका: विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडर १४४ रुपयांनी महाग

देशातील बहुतांश खेड्यांमध्ये बँकांच्या शाखा आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमनानेही बँकिंग कार्यात अधिक स्थिरता आणली आहे. नियामक म्हणून रिझर्व बँक ऑफ इंडियाची भूमिका व्यापक करण्यात आली आहे. यामुळे गैरप्रकारांना आळा बसेल आणि आमच्या आर्थिक प्रणाली अधिक विश्वासार्ह बनतील, असा विश्वास कोविंद यांनी व्यक्त केला.

एनआयबीएममधील सुविधांचा उपयोग गरीब घटकांसाठी आर्थिक उत्पादने तयार करण्यासाठी केला जाणे आवश्यक आहे. देशाची प्रगती गरिबांच्या सामूहिक आर्थिक सामर्थ्याच्या योगदानावर अवलंबून असल्याचे कोविंद यांनी सांगितले. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, परिवहन मंत्री अनिल परब, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तीकांत दास, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेन्टचे संचालक डॉ. के. एल. धिंग्रा उपस्थित होते.

हेही वाचा-कोरोनाचा 'स्मार्टफोन'ला विळखा; देशातील उद्योगावर परिणाम होण्याची भीती

हे काम करते 'एनआयबीएम’

क्षमता वाढीसाठी राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेची ‘एनआयबीएम’ स्थापना ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँकांच्या दूरदृष्टीचे द्योतक आहे. बँक व्यवस्थापनात संशोधन, प्रशिक्षण, शिक्षण आणि सल्ला यासाठी स्वायत्त शिखर संस्था म्हणून संस्थेची स्थापना करण्यात आली. एनआयबीएममध्ये चांगल्या संशोधन सुविधा आहेत.

Last Updated : Feb 12, 2020, 5:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.