मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक ही पुढे ढकलण्यात आली आहे. ही बैठक २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान होणार होती.
आरबीआयच्या पतधोरण समितीची बैठक २९, ३० सप्टेंबर आणि १ ऑक्टोबरला होणार होती. ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे आरबीआयने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पतधोरण समितीच्यी बैठकीच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहेत.
हेही वाचा-तीन संचालकांची समिती चालविणार लक्ष्मी विलास बँकेचे कामकाज; आरबीआयची मान्यता
दरम्यान, पतधोरण समिती ऑक्टोबर २०१६ पासून अस्तित्वात आली आहे. या समितीमध्ये सहा सदस्य आहेत. यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर, डेप्युटी गव्हर्नर आणि कार्यकारी संचालक यांचा समावेश आहे. याचबरोबर केंद्र सरकारने नियुक्त केलेले तीन सदस्य असतात. पतधोरण समितीवरील सदस्यांचा कार्यकाळ नुकताच संपला आहे. नवीन सदस्यांची निवड करण्याबाबत केंद्र सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही.
हेही वाचा-मुंबई शेअर बाजारात ५९३ अंशांनी तेजी; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कोरोना महामारीचा आर्थिक चलनवलनावर परिणाम झाला होता. दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सुधारेल, असा आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी नुकतेच विश्वास व्यक्त केला आहे.