ETV Bharat / business

आरबीआयकडून पीएमसी बँकेवरील निर्बंधात तीन महिन्यांची वाढ - आरबीआय निर्बंध

ठेवीदार आणि सहकारी बँकांची स्थिरता टिकविण्यासाठी आरबीआयने भागीदार आणि विविध यंत्रणांशी चर्चा केली आहे. पीएमसी बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

पीएमसी बँक
पीएमसी बँक
author img

By

Published : Mar 21, 2020, 6:25 PM IST

मुंबई - पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेतील खातेदारांच्या अडचणी अजूनही संपल्या नाहीत. भारतीय रिझर्व्ह बँकेने पीएमसीवरील निर्बंधात आणखी तीन महिन्यांचा २२ जून, २०२० पर्यंत वाढ केली आहे.

आरबीआयला पीएमसीमध्ये आर्थिक नियमितता आणि एचडीआयएल कंपनीला दिलेल्या कर्जाची चुकीची माहिती आढळून आली होती. त्यामुळे आरबीआयने पीएमसीवर सहा महिन्यांचे निर्बंध २३ सप्टेंबर २०१९ ला लागू केले होते. वाणिज्य बँकेप्रमाणे सहकारी बँकेला योजना लागू करण्याचे आरबीआयला अधिकार नाहीत. असे असले तरी ठेवीदार आणि सहकारी बँकांची स्थिरता टिकविण्यासाठी आरबीआयने भागीदार आणि विविध यंत्रणांशी चर्चा केली आहे. पीएमसी बँकेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आरबीआयने म्हटले आहे.

हेह वाचा-सॅनिटायझरच्या वाढत्या किमतीला सरकारचा चाप, जाणून घ्या 'हा' नियम

आर्थिक निर्बंधामुळे पीएमसीला नवे कर्ज देणे व ठेवी स्वीकारता येत नाहीत. आरबीआयने पीएमसी संचालक मंडळाच्याजागी आरबीआयच्या माजी अधिकाऱ्याची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

हेही वाचा-तुमच्या हातामधील नोटांनीही पसरू शकतो कोरोना, एसबीआयने सूचविला 'हा' पर्याय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.