ETV Bharat / business

अनधिकृत डिजीटल अ‌ॅपवरून कर्ज घेताना सावध! आरबीआयकडून जनतेला इशारा - RBI on KYC documents

ऑनलाईन व डिजीटल अ‌ॅपमधून कर्ज घेताना जनतेने सावध राहावे, असे आरबीआयने म्हटले आहे. केवायसीची कागदपत्रे ही अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा सल्लाही आरबीआयने दिले आहे.

आरबीआय
आरबीआय
author img

By

Published : Dec 23, 2020, 8:58 PM IST

मुंबई - डिजीटल व्यवहार करताना तुम्ही ऑनलाईन अ‌ॅपवरून कर्ज घेत असाल तर सावध राहा. कारण, यामधून फसवणूक होण्याची शक्यता असल्याचा भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरिकांना इशारा दिला आहे.

त्वरित आणि विना त्रास कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या डिजीटल अपच्या मोहात पडू नका, असे आरबीआयने म्हटले आहे. या अ‌ॅपमधून जादा व्याजदर आणि अतिरिक्त छुपे शुल्क कर्जदारांकडून घेतले जातात. तसेच कर्जदाराकडून मिळणाऱ्या डाटाचा गैरवापर करण्यात येतो, असे आरबीआयने म्हटले आहे. त्यामुळे ऑनलाईन व डिजीटल अ‌ॅपमधून कर्ज घेताना जनतेने सावध राहावे, असे आरबीआयने म्हटले आहे. केवायसीची कागदपत्रे ही अनोळखी व्यक्तींना देऊ नये, असा सल्लाही आरबीआयने दिले आहे.

हेही वाचा-शक्तीकांत दास यांची बँकांच्या व्यवस्थापकीय संचालकांशी कर्जाच्या व्याजदराबाबत चर्चा

अधिकृत माहिती वेबसाईटवर उपलब्ध

ग्राहक https:achet.rbi.org.in या वेबसाईटवर ऑनलाईन तक्रार करू शकतात. डिजीटल पद्धतीने केवळ बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना कर्ज देता येते, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. अधिकृत बँक आणि बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांची माहिती आरबीआयने वेबसाईटवर दिली आहे.

हेही वाचा-सलग सोळाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.