नवी दिल्ली - आयडीसीच्या अहवालानुसार, जागतिक पारंपरिक संगणकांच्या (पीसी - पर्सनल कॉम्प्युटर) बाजारात वार्षिक 14.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. वर्ष 2020 च्या तिसर्या तिमाहीत या 8.13 कोटी संगणकांची विक्री झाली.
लिनोवो क्यू3 मध्ये 23.7 टक्के भागासह सर्वांत आघाडीवर आहे. तर, एचपी 23 टक्क्यांसह दुसर्या आणि डेल 14.8 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
आशिया पॅसिफिक क्षेत्रात मात्र पारंपरिक संगणक बाजारात एक-आकडी टक्क्यांचीच वाढ दिसून आली. या क्षेत्रात जपानचाही समावेश आहे.
दरम्यान, अमेरिकेत पारंपरिक संगणक बाजारामध्ये चांगली वाढ दिसून आली. 2020 वर्षातील तिसर्या तिमाहीत या विभागात विक्रीमध्ये सर्वाधिक दोन-आकडी टक्क्यांची वाढ झाली.
हेही वाचा - सॅमसंगने किफायतशीर ए-42 5जी स्मार्टफोनचे केले लाँचिंग