नवी दिल्ली - काही जणांचे राजकीय स्वारस्य आहे, हे दुर्दैव आहे. ते शेतकऱ्यांना चुकीचे मार्गदर्शन करत आहेत, असे पियूष गोयल यांनी म्हटले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. त्यावरून गोयल यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल म्हणाले, की कायद्यातील बदल शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, हे त्यांना कळेल. शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी हा बदल केला आहे. पेन आणि थर्मास उत्पादकांना विक्री करण्याच्या ठिकाणाचे बंधन नाही. तसेच शेतकऱ्यांना मालाची विक्री करण्याचे बंधन नाही. या स्वातंत्र्यासाठी शेतकरी पात्र आहेत.
हेही वाचा-आंदोलन करत रस्त्यावर उतरलेले लोक शेतकरी नव्हेत, भाजप नेत्याची टीका
पुढे गोयल म्हणाले,की शेतकऱ्यांचे हात बळकट होण्यासाठी सरकार काम करत आहेत. आपला देश आणि शेतकरी अधिक बळक करण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. शेतकऱ्यांना स्वत:ची उत्पादने देशाच्या बाजारपेठेत विक्री करता येणार असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री गोयल यांनी म्हटले.
हेही वाचा-जीएसटीचे संकलन कमी होत असल्याने पंजाबनेही स्वीकारला कर्जाचा पर्याय
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नव्या कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी 'दिल्ली चलो' अशी आंदोलनाची हाक दिली आहे. हजारो शेतकरी शुक्रवारी नवी दिल्लीत धडकले आहेत.