ETV Bharat / business

‘भारत हे जगाचे रुग्णालय होईल’

author img

By

Published : Aug 21, 2020, 2:53 PM IST

पियूष गोयल म्हणाले, की कोरोना लढ्यात लागणारी स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी वैद्यकीय साधनांच्या उद्योगांनी मदत केली आहे. आपल्या देशातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी सामान्य माणसांची सेवा केल्याने देशाला त्यांचा अभिमान आहे.

संग्रहित-पियूष गोयल
संग्रहित-पियूष गोयल

नवी दिल्ली – भारत हे जगाचे रुग्णालय होणार आहे, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी व्यक्त केला. तसेच भारत हे जगाचे औषधी दुकान होईल, असेही गोयल यांनी म्हटले. ते भारतीय औद्योगिक महासंघाच्या (सीआयआय) 12 वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या जागतिक परिषदेत बोलत होते.

पियूष गोयल म्हणाले, की भारत हे जगाचे रुग्णालय होणार आहे. त्यामधून संपूर्ण जगाला भारतामधील उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा वापरता येणार आहेत. भारत हा संपूर्ण जगाला उच्च दर्जाचे उपचार देणार आहे. वैद्यकीय साधनांचा उद्योग हा देशात नवीन तंत्रज्ञान आणण्यात आघाडीवर आहे. त्यामधून भारताला जागतिक व्यापारात योग्य स्थान मिळण्याची खात्री राहणार आहे. रुग्णालयांना लागणारी वैद्यकीय साधने भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरवू शकणार आहे. भारतीय औषधी उद्योगाने देशाला व जगाला औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यात सातत्य ठेवावे, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.

पुढे गोयल म्हणाले, की कोरोना लढ्यात लागणारी स्वदेशी वैद्यकीय उपकरणे तयार करण्यासाठी वैद्यकीय साधनांच्या उद्योगांनी मदत केली आहे. आपल्या देशातील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांनी सामान्य माणसांची सेवा केल्याने देशाला त्यांचा अभिमान आहे. त्यांनी देशाची सुरक्षितता आणि चांगलेपणा टिकविण्यासाठी बांधिलकी दाखविली आहे. पुढील काळात प्रतिबंधात्मक आरोग्य काळजी घेणारे वेलनेस सेंटर हा भविष्यातील मार्ग असणार आहे. तंदुरुस्त राहा हा आमच्या सरकारचा मंत्र राहिलेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.