नवी दिल्ली - पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने (पीएफसी) कोरोनाच्या लढ्याकरता आणखी १ कोटी रुपयांची मदत केली आहे. यापूर्वी पीएफसीने राजस्थानमधील रेड क्रॉस सोसायटीला वैद्यकीय साधनांसाठी ५० लाखांची मदत केली होती. तर गेल्या महिन्यात पीएफसीने पीएम केअर्सला २०० कोटींची मदत केली आहे.
पीएफसीने बुलंदशहर आणि सिद्धार्थनगर या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची मदत केली आहे. ही मदत मास्क आणि सॅनिटायझरच्या वितरणासाठी करण्यात येणार आहे.
हेही वाचा-फ्लिपकार्टसह वॉलमार्ट कोरोनाच्या लढ्याकरता करणार ४६ कोटींची मदत
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ही उर्जा मंत्रालयाच्या अधिपत्याखाली संस्था आहे. ही उर्जा क्षेत्रातील सर्वात मोठी बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहे.