नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प ५ जुलैला सादर केल्यापासून सर्वात अधिक पेट्रोल आणि डिझेलचे दर आज वाढले आहेत. सौदीमधील तेल प्रकल्पावरील हल्ल्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. याचा परिणाम तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत.
दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर २५ पैशांनी वाढून प्रति लिटर ७२.४२ रुपये झाला आहे. तर डिझेलचा दर २४ पैशांनी वाढून प्रति लिटर ६५.८२ रुपये झाला आहे. मंगळवारी पेट्रोलचे दर १४ पैसे तर डिझेलचे दर १५ पैशांनी वाढले होते.
हेही वाचा-भारताला पुन्हा जीएसपीचा दर्जा द्यावा; अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींची ट्रम्प सरकारला विनंती
कच्च्या तेलाचा तिसऱ्या क्रमांकाचा ग्राहक असलेला भारत परिस्थितीवर देखरेख ठेवत असल्याचे केंद्रीय पेट्रोलिय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी सांगितले. भारत उर्जेच्या गरजेची पूर्तता करण्यासाठी ८३ टक्के कच्च्या तेलाची इतर देशांकडून आयात करतो. सौदी अरेबिया हा दुसऱ्या क्रमांकाकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात केले जाते.
हेही वाचा-उबेरसह ओलाच्या वाढत्या किंमतीवर नियंत्रण आणा; स्वदेशी जागरण मंचची मागणी