नवी दिल्ली - सरकारी तेल विपणन कंपनीने (ओएमसीएस) पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ विक्रीत आज वाढ केली आहे. दोन महिन्यांच्या दरवाढीतील विश्रांतीनंतर तेल कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले होते.
दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर १५ पैशांनी वाढून ८१.३८ रुपये आहेत. तर डिझेलची किंमत २० पैशांनी वाढून ७०.८८ रुपये प्रति लिटर आहे. राज्यांकडून पेट्रोल-डिझेलवर व्हॅट आकारण्याचे प्रमाण निरनिराळे असल्याने देशातील राज्यांमध्ये इंधनाचे एकसारखे नाहीत.
...म्हणून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ
- कोरोनाची लस बाजारात येईल, या आशेने जागतिक बाजारात तेलाचे दर आणि मागणी वाढली आहे.
- तेलाच्या किमतीचा निर्देशांक असलेल्या ब्रेन्ट क्रुडची किंमत प्रति बॅरल ४५ डॉलर आहे. ऑक्टोबरमध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ही ४० डॉलरपर्यंत राहिली आहे.
- दरम्यान, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या दराचा सरकारी तेल कंपन्यांकडून रोज आढावा घेण्यात येतो. त्यानंतर रोज सकाळी पेट्रोल-डिझेलचे दर सरकारी तेल कंपन्यांकडून जाहीर करण्यात येतात.
येत्या काही आठवड्यांत पुन्हा इंधनाचे दर वाढणार असल्याचे सरकारी तेल विपणन कंपनीमधील सूत्राने सांगितले. कोरोना महामारीत जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले होते. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर राहिल्या होत्या.