ETV Bharat / business

पेट्रोल प्रति लिटर २३ पैसे, डिझेलच्या दरात २५ पैशांची वाढ

author img

By

Published : May 25, 2021, 4:43 PM IST

संपूर्ण देशात इंधनाचे दर प्रति लिटर २० ते २७ पैशांनी वाढले आहेत. मात्र, किरकोळ विक्रीत इंधनाचे दर हे स्थानिक करानुसार भिन्न असणार आहे

petrol diesel rate
पेट्रोल डिझेल दर

नवी दिल्ली - एक दिवसाच्या विश्रांतीनंर सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले आहेत. पेट्रोलचे दर प्रति लिटर २३ पैशांनी वाढून ९३.४४ रुपये आहेत. तर डिझेलचे दर प्रति लिटर २५ पैशांनी वाढून ८४.३२ रुपये आहेत.

संपूर्ण देशात इंधनाचे दर प्रति लिटर २० ते २७ पैशांनी वाढले आहेत. मात्र, किरकोळ विक्रीत इंधनाचे दर हे स्थानिक करानुसार भिन्न असणार आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९९.७१ रुपये आहे. यापूर्वीच महाराष्ट्रातील परभणीसह राजस्थान, मध्यप्रदेशमधील शहरांमध्ये इंधनाच्या दराने प्रति लिटर १०० रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. मे महिन्यात १३ वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचे दर एकूण प्रति लिटर ३.०४ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ३.५९ रुपयांनी वाढले आहेत.

हेही वाचा-विदेशात बेपत्ता झालेल्या मेहुल चोक्सीचा शोध; सीबीआय इंटरपोलची घेणार मदत

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ-

पाच राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभा निवडणुकीत सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाचे दर वाढविले नव्हते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असताना सरकारी तेल कंपन्यांना प्रति लिटर २ ते ३ रुपयांचे नुकसान सोसावे लागले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढवून प्रति बॅरल ६९ डॉलरवर पोहोचले आहेत.

हेही वाचा-कोरोना महामारीतही भारतामधील थेट विदेशी गुंतवणुकीत 10 टक्क्यांनी वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.