ETV Bharat / business

व्हॉट्सअ‌ॅपवरून आता पैसे पाठवता येणार! - व्हॉटसअ‌ॅप फिचर्स न्यूज

व्हॉट्सअ‌ॅपवरून पैसेही पाठवण्याची सुविधा देण्यात आली आहे. पेटीएम आणि मोबीक्विक प्रमाणेच व्हॉटसअ‍ॅपवरूनही ग्राहक आर्थिक देवाण-घेवाण करू शकणार आहेत. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉटसअ‍ॅपला युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापराची परवानगी दिली आहे.

व्हॉटसअ‌ॅप
व्हॉटसअ‌ॅप
author img

By

Published : Nov 6, 2020, 3:17 PM IST

हैदराबाद - व्हॉट्सअ‍ॅपवरून आपण फोटो, व्हिडिओ पाठवण्याची सोय होती. आता व्हॉट्सअ‌ॅपवरूनही पैसे पाठवण्याची सुविधा निर्माण झाली आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) व्हॉट्सअ‍ॅपला युनिफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापराची परवानगी दिली आहे. पेटीएम आणि मोबीक्विक प्रमाणेच व्हॉट्सअ‍ॅपवरूनही ग्राहक आर्थिक देवाण-घेवाण करू शकणार आहेत. यात विशेष म्हणजे, व्हॉट्सअ‌ॅपवर कुठलेही शुल्क आकारणार नाही. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप आता पेटीएम व इतर अ‍ॅपला टक्कर देऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपचे भारतामध्ये सर्वांत जास्त युजर्स आहेत. त्यामुळे जास्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या सुविधेमुळे क‌ॅशलेस व्यवहारांना आणखी बळ मिळण्याची चिन्हं आहेत. तसेच प्रत्येक व्यवहारावर कॅशबॅक आणि चांगल्या ऑफरमुळे, गुगल पे लोकप्रिय ठरतंय. त्यामुळे 'गुगल-पे' ला तगडा प्रतिस्पर्धी व्हॉट्सअ‍ॅप ठरणार आहे.

युजरफ्रेंडली व्हॉट्सअ‍ॅप -

2009 मध्ये व्हॉट्सअ‍ॅप लाँच झाले होते. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येकाच्या फोनमध्ये आपल्याला हे अ‌ॅप दिसून येईल. व्हॉट्सअ‍ॅप आपल्या भन्नाट फिचर्समुळे जागतिक पातळीवर अब्जावधी लोकांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. 2014 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपची वाढती प्रसिद्धी पाहून सोशल नेटवर्किंग कंपनी फेसबुकने व्हॉट्सअ‍ॅपचे सर्व मालकी हक्क विकत घेतले होते. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कमालीचे अपडेटस येत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.