नवी दिल्ली - रिलायन्स कम्युनिकेशनचे चेअरमन अनिल अंबानी आणि २ संचालकांना सर्वोच्च न्यायालयाने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. याप्रकरणी न्यायालयाने अंबानी यांना एरिकसन कंपनीचे थकवलेले ४५३ कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. हे पैसे दिले नाही, तर अनिल अंबानींसह इतर २ संचालकांना ३ महिन्याचा तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
याबाबत रिलायन्स कम्युनिकेशनच्या प्रवक्त्याने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी व त्यांचे सहकारी संचालक सतिश सेठ, छाया विरानी यांना १ कोटींचा दंडही ठोठावला आहे. हा दंड सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये भरण्याचे आदेश देण्यात आले आहे. दंड न भरल्यास तुरुंगावसाची शिक्षा भोगावी लागणार आहे.