ETV Bharat / business

कोरोनाशी लढा: देशात रोज 'इतक्या' पीपीई कीटची होतेय निर्मिती - कोरोना संकट

देशातील उत्पादकांनी नुकतेच व्हेटिंलेटरची निर्मिती सुरू केली आहे. तर नऊ उत्पादकांना ५९ हजार व्हेटिंलेटर पुरवण्याचे काम दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील उच्चस्तरीय मंत्र्यांच्या बैठकीत दिली. देशात पुरेसे पीपीई कीट व मास्क असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले

पीपीई कीट
पीपीई कीट
author img

By

Published : Apr 25, 2020, 6:04 PM IST

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात वैद्यकीय साधनांची देशाला अत्यंत गरज आहे. अशा स्थितीत देशात रोज १ लाख पीपीई कीट आणि एन-९५ मास्कची निर्मिती करण्यात येत आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली.

देशातील उत्पादकांनी नुकतेच व्हेटिंलेटरची निर्मिती सुरू केली आहे. तर नऊ उत्पादकांना ५९ हजार व्हेटिंलेटर पुरवण्याचे काम दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने कोरोनावरील उच्चस्तरीय मंत्र्यांच्या बैठकीत दिली. देशात पुरेसे पीपीई कीट व मास्क असल्याचेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-खनिज तेलाचे दर घसरूनही पेट्रोल-डिझेलचे दर ४० दिवसांपासून स्थिर

देशात पीपीई कीटची निर्मिती करणाऱ्या १०४ कंपन्या आहेत. तर एन-९५ मास्कची निर्मिती करणाऱ्या तीन कंपन्या आहेत. कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यूदर हा ३.१ टक्के आहे. तर रुग्ण बरे होण्याचा दर हा २० टक्के आहे. हे प्रमाण जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत चांगले आहे. हा टाळेबंदीसह कंटेन्टमेंट आणि क्लस्टर मॅनेजमेंटचा झालेला सकारात्मक परिणाम असू शकतो.

हेही वाचा-चिनी मालावर बहिष्कार; स्वदेशी जागरण मंच सुरू करणार मोहीम

डॉक्टरांच्या सुरक्षेविषयी विचारले असता केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले, की साथरोग नियंत्रण कायदा, १९८७ मध्ये सुधारणा केली आहे. कायद्यातील नव्या सुधारणेप्रमाणे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कोरोनाचा लढा केवळ डॉक्टरांचा नाही. हे सर्वांचे प्रयत्न आहेत. डॉक्टर हे आपले आघाडीवरील योद्धे आहेत. देश म्हणून त्यांचा केवळ आदर नव्हे तर त्यांची सुरक्षितता आणि स्वाभिमानाचे रक्षण करण्याची खात्री दिली पाहिजे, असेही केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.