ETV Bharat / business

सेन्सेक्स ३०० अंशांनी घसरला; निफ्टी ८,३००च्या खाली आपटी.. - सेन्सेक्स शुक्रवार दर

गुरूवारी रामनवमी असल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे बंद होते. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच त्यात ही घसरण दिसून आली.

Opening Bell: Sensex falls 300 points, Nifty below 8,300
सेन्सेक्स ३०० अंशांनी घसरला; निफ्टी ८,३००च्या खाली..
author img

By

Published : Apr 3, 2020, 9:53 AM IST

मुंबई - शुक्रवारी शेअर बाजार उघडताच बीएसई सेन्सेक्स ३५१.३२ अंशांनी कोसळला. तसेच, एनएसई निफ्टीही ४९.५५ अंशांनी घसरलेला दिसून आला. सकाळच्या सत्रामध्ये सेन्सेक्स २७,९१३.९९ अंशांवर स्थिरावला होता, तर निफ्टी ८,२०४.२५ अंशावर स्थिरावला.

गुरूवारी रामनवमी असल्यामुळे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज हे बंद होते. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी शेअर बाजार उघडताच त्यात ही घसरण दिसून आली. रामनवमीनिमित्ताने धातू, सराफ बाजारांसह घाऊक वस्तू बाजारही गुरूवारी बंद होते. यासोबतच, परकीय चलन आणि कमोडिटी फ्युचर्स बाजारामध्येही कोणताही व्यवहार सुरू नव्हता.

बुधवारी बीएसई एस अँड पी सेन्सेक्स २८,२६५ अंशांवर बंद झाला होता. तर, निफ्टी ८,२५४ अंशांवर बंद झाला होता. बुधवारीही शेअर बाजारात घसरणच दिसून आली होती. एक दिवसाच्या सुट्टीनंतर आज शुक्रवारीही बाजार उघडतानाच घसरलेला दिसून आला.

हेही वाचा : जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करताना कंपन्यांची कसरत; 'हे' आहे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.