ETV Bharat / business

भाववाढीची 'करामत': राजधानीत सफरचंदांपेक्षा कांदे महाग! - मराठी बिझनेस न्यूज

किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रति किलो ६० ते ७० रुपये झाला आहे.  आझादपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्राच्या माहितीनुसार मोसमी सफरचंदांना प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहेत.

संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 23, 2019, 7:58 PM IST

Updated : Sep 23, 2019, 9:02 PM IST

नवी दिल्ली - तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण दिल्लीत कांद्यांचा भाव हा सफरचंदांहून अधिक झाला आहे. भाजीपाल्याचा घाऊक बाजारपेठेत कांदा हा ५० रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे. तर दुसरीकडे फळांच्या बाजारपेठेत सफरचंदांना प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचा भाव प्रति किलो ६० ते ७० रुपये झाला आहे. आझादपूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सूत्राच्या माहितीनुसार मोसमी सफरचंदाला प्रति किलो ३० ते ४० रुपये भाव मिळत आहेत. तर चांगल्या सफरचंदाचा भाव १०० रुपये प्रति किलो झाला आहे. शिमल्यावरून येणारे सफरचंद घाऊक बाजारात ३० ते ६० रुपये किलो दराने विकले जात असल्याचे आझादपूर फळे आणि भाजीपाला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एम.आर.कृपलानींनी सांगितले. तर काश्मीरच्या सफरचंदांना घाऊक बाजारात प्रति किलो २० ते ५० रुपये दर मिळत आहे.

हेही वाचा-सरकार झुकले..! कांदा आयात करण्याच्या नव्या निविदेत पाकिस्तानला कोलदांडा

असे असले तरी आझादपूरच्या कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा यांनी सोमवारी कांद्याच्या किमती कमी झाल्याचे सांगितले. तसेच सोमवारी १५० ट्रकची आवक झाल्याचेही त्यांनी सांगितले. घाऊक बाजारात कांदा प्रति किलो २५ ते ४५ रुपये दराने विकले जात आहेत.

हेही वाचा-कांद्याच्या दराने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी; गेल्या ४ वर्षातील भाववाढीचा उच्चांक

मध्यप्रदेशसह दक्षिणेकडील राज्यांतून होणारी कांद्याची आवक कमी झाल्याने कांद्याचे दर वाढल्याचे शर्मा यांनी सांगितले. कमी पुरवठा झाल्याने घाऊक बाजारात कांदा ५० रुपये किलो दराने विकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर दिल्लीसह एनसीआरमध्ये कांद्याचा दर ७५ किलोपर्यंत पोहोचला होता. येत्या काही महिन्यात परिस्थिती सुधारेल, असे कृपलानी यांनी सांगितले. कांद्याच्या साठेबाजीचे प्रमाण जास्त नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा-...म्हणून केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध

Intro:Body:

dummmy

Conclusion:
Last Updated : Sep 23, 2019, 9:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.