मुंबई - अर्थव्यवस्थेत वर्ष २०१९-२० मध्ये २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई झाली नाही. दरवर्षी या नोटांचे अर्थव्यवस्थेत वितरण कमी झाल्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालामधून दिसून आले आहे.
देशात नोव्हेंबर २०१६ मध्ये १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्यात आल्या आहेत. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेल्या २ हजार नोटाचे प्रमाण चलनातून कमी झाले आहे.
- मार्च २०१८ अखेर २ हजार रुपयांच्या ३३ हजार ६३२ लाख नोटांचे अर्थव्यस्थेत वितरण झाले होते. तर मार्च २०१९ मध्ये २ हजार रुपयांच्या ३२ हजार ९१० लाख नोटांचे वितरण झाले. हे प्रमाण घसरून मार्च २०२० मध्ये २७ हजार ३९८ लाख नोटांचे वितरण झाले आहे.
- मार्च २०२० अखेर २ हजार नोटांचे एकूण चलनी नोटांच्या तुलनेत २.४ टक्के प्रमाण होते. तर मार्च २०१९ अखेर २ हजार नोटांचे एकूण चलनी नोटांच्या तुलनेत ३ टक्के प्रमाण होते. मार्च २०१८ अखेर एकूण चलनी नोटांपैकी २ हजार नोटांचे प्रमाण ३.३ टक्के होते.
- २ हजार नोटांचे एकूण चलनी मुल्यातही प्रमाण घसरले आहे. एकूण चलनाच्या मुल्यात २ हजार नोटांचे मूल्य हे मार्च २०२० मध्ये २२.६ टक्के होते. तर मार्च २०१९ मध्ये २ हजार नोटांचे मूल्य एकूण चलनाच्या ३१.२ टक्के होते.
दुसरीकडे ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण चलनात अंशत: वाढले आहे. २ हजार रुपयांच्या नोटांची छपाई कमी करण्याचा कोणताही उद्देश नसल्याचेही आरबीआयने म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह नोट मुद्रण प्रायव्हेट लि. आणि सिक्युरिटी प्रिटिंग आणि मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आरबीआयला चलनी नोटांचा नव्याने पुरवठा झाला नसल्याचे आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले आहे.