नवी दिल्ली - सलग पाचव्या महिन्यात गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात आज १९ रुपयांची वाढ झाली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूचे दर वाढल्याने देशातही गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. विमान इंधनाचे दरही २.६ टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारपेठेतील महागाई, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर अशा विविध महागाईला सर्वसामान्य माणूस सामोरे जात आहे.