ETV Bharat / business

महामारीबरोबर जगाची लढाई तरीही संरक्षण कंपन्यांच्या संपत्तीत वाढ

author img

By

Published : Jul 13, 2021, 4:47 PM IST

जगभरातील टॉप 100 संरक्षण कंपन्यांची माहिती संरक्षणविषयक माध्यमाने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अमेरिका आणि चीनमधील संरक्षण कंपन्या आघाडीवर आहेत.

top defence firms
संरक्षण कंपन्यांच्या संपत्तीत वाढ

नवी दिल्ली - कोरोना महामारीबरोबर जग लढत असताना जागतिक अर्थव्यवस्थासह विविध कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. असे असले तरी शस्त्रास्त्रे, सैन्यदलाशी निगडीत संरक्षण उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला नाही. उलट या कंपन्यांच्या संपत्तीत 2020 मध्ये वाढ झाली आहे.

जगभरातील टॉप 100 संरक्षण कंपन्यांची माहिती संरक्षणविषयक माध्यमाने प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये अमेरिका आणि चीनमधील संरक्षण कंपन्या आघाडीवर आहेत. अमेरिकेतील सर्वात मोठ्या 10 संरक्षण कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या उत्पन्नात किमान 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे प्रमाण सुमारे 11 अब्ज डॉलर आहे. तर दुसरीकडे चीनच्या संरक्षण कंपन्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे.

हेही वाचा-देशातील कोरोनाची 'आर-व्हॅल्यू' वाढली; ही धोक्याची घंटा - आयएमएससी

अमेरिकेतील संरक्षण कंपन्या आघाडीवर

जगभरातील आघाडीच्या 5 संरक्षण कंपन्यांमध्ये अमेरिकेतील युएस लॉकहार्ड मार्टिन, रेथिऑन टेक्नॉलॉजीस, बोईंग, नॉर्थरॉप ग्रुममॅन आणि जनरल डायनॅमिक्स या कंपन्यांचा समावेश आहे. तर चीनच्या एव्हिश्न इंडस्ट्री कॉर्पोरेशन ऑफ चायना, चायना नॉर्थ इंडस्ट्रीज ग्रुप, चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन आणि चायना एअरोस्पेस सायन्स आणि इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन या कंपन्यांचा समावेश आहे. जगभरातील आघाडीच्या 20 संरक्षण कंपन्यांमध्ये आठ अमेरिकन, सात चिनी, इटली, रशिया, फ्रान्समधून प्रत्येकी एक तर फ्रान्स-नेदरलँडची संयुक्त कंपनी आहे.

हेही वाचा-देशात पहिल्यांदा कोरोना झालेल्या महिलेला दुसऱ्यांदा लागण

भारतामधील दोन कंपन्यांचा टॉप 100 मध्ये समावेश

  • आघाडीच्या संरक्षण उत्पादनामध्ये भारताच्या दोन कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ही 45 व्या स्थानावरून 41 व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ही 61 व्या स्थानावर कायम आहे.
  • हिंदुस्थान एअरोनॉटिक्सचे उत्पन्न 11 टक्क्यांनी वाढले आहे. भेलचे उत्पादन हे 4 टक्क्यांनी वाढले आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये सायबर, अंतराळ, सॅटेलाईट इमेजरी, सेन्सरी आणि इतर नवीन विकसित होणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्याही नव्याने प्रगती करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.