चेन्नई- जोपर्यंत लीगल एनटीटी आयडेन्टिफायर ऑफ इंडियाकडून (एलईआय) कर्जदारांना एलईआय कोड मिळत नाही, तोपर्यंत त्यांना कर्जाचे नूतनीकरण किंवा वाढीव कर्ज देऊ नये, असे विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) विमा कंपन्यांना सांगितले आहे.
एका परिपत्रकात, इरडाने विमा कंपन्या आणि त्यांच्याद्वारे नियमन होणाऱ्या इतरांना 31 जुलै, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी एलईआय कोड मिळविण्यासाठी विचारणा केली आहे.
तसेच ज्या विमा कंपन्यांमध्ये 50 हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या कर्जाची नोंद असलेले कॉर्पोरेट कर्जदार आहेत, आशा कर्जदारांनी देखील 30 जून, 2020 रोजी किंवा त्यापूर्वी एलईआय कोड मिळवून घेण्याचा सल्ला द्यावा, अशी सूचना इरडाने विमा कंपन्यांना केली आहे.
त्याचबरोबर, जे कर्जदार एलईआय कोड प्राप्त करत नाहीत, त्यांना कर्ज नूतनीकरण किंवा वाढ देऊ नये आणि एलईआय कोडशिवाय कोणतीही नवीन कर्ज मंजूर केली जाऊ नये, असेही इरडाने परिपत्रकात म्हटले आहे.