नवी दिल्ली – मोबाईल वापरकर्त्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वापरकर्त्यांची माहिती चोरणाऱ्या ब्लॅकरॉकच्या नव्या मालवेअरचा मेमध्ये आणखी धोका वाढला आहे. ही माहिती थ्रेटफॅबरिक या मोबाईल सुरक्षा संस्थेने शोधून काढली आहे.
ब्लॅकरॉकच्या धोक्याविषयी थ्रेटफॅबरिकचे अधिकारी कर्नल इंद्रजीत यांनी माहिती दिली. ज्या अॅपमध्ये ब्लॅकरॉक मालवेअर येते, त्यामधून अँड्राईड सेवेमध्ये बदल करण्यात येतात. त्यामुळे वापरकर्त्याच्या मोबाईलमधून बनावट गुगल अपडेटला परवानगी दिली जाते.
ब्लॅकरॉक हे वापरकर्त्यांच्या थेट अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टमधील फीचर वापर करण्याची परवानगी घेते. त्यामुळे इतर अनिधकृत अँड्राईड अॅपला मोबालईचा वापर करण्याची तांत्रिकदृष्ट्या परवानगी मिळते. हे मालवेअर थेट बँकिंग अॅपवर हल्ला करत नाही. मात्र, फेसबुक, ट्विटर, स्काई, टिकटॉकमधील अॅपमध्ये शिरकाव करते. अशा 337 अॅपल मालवेअर हल्ला करत असल्याचे थ्रेटफॅबरिक कंपनीला आढळून आले.
अशी घ्या काळजी
- अँड्राईड सिस्टीम अपडेट ठेवा.
- मोबाईलमध्ये अधिकृत अँटीव्हायरस ठेवा.
- कोणत्याही संशयास्पद अथवा असुरक्षित अपला डाऊनलोड करू नका.
- कोणत्याही अॅपला तुमचा मोबाईल अपडेट करण्याची परवानगी देवू नका.
मालवेअर म्हणजे काय?
मालवेअर म्हणजे संगणकीय आज्ञावली (प्रोग्रॅमिंग) असते. या प्रोग्रॅमिंगमधून मोबाईल अथवा कॉम्प्युटरचे काम हे विस्कळित होते. तसेच वापरकर्त्याची माहिती हॅकरकडे पाठविली जाते.