मुंबई - टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांनी लग्न न करण्याचे कारण एका फेसबुक पेजवर सांगितले आहे. भारत-चीनमदरम्यान १९६२ दरम्यान युद्ध सुरू असल्याने लग्न मोडल्याचे टाटा यांनी सांगितले.
रतन टाटा यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' पेजला माहिती दिली. ते म्हणाले, लाँस अँजिलिसमध्ये तेव्हा एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. तेव्हा जवळजवळ लग्न झाल्यासारखे होते. टाटा यांच्या आजींना खूप दिवसांपासून बरे वाटत नसल्याने ते भारतात परतले. ते म्हणाले, जेव्हा मी तिला परत भेटण्यासाठी गेलो. तेव्हा जिच्यासोबत लग्न करायचे आहे, ती भारतात परतेल असे वाटले. मात्र, भारत-चीनमध्ये युद्ध सुरू असल्याने तिच्या पालकांना ते ठीक वाटले नाही. त्यामुळे हे नातेसंबंध संपुष्टात आल्याचे रतन टाटा यांनी प्रांजळपणाने सांगितले.
![courtesy - Humans of Bombay Page](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6059511_tata.jpg)
टाटा यांनी आपले वैयक्तिक आयुष्यातील अनुभव आणि त्यांना आजीकडून मिळालेले शिक्षण सांगितले. आजीने धाडसाने आणि अभिमानाने बोलायला शिकविले. जेव्हा माझ्या आईने दुसरा विवाह केला तेव्हा शाळेतील मुलांनी सर्व काही सातत्याने आणि आक्रमकपणाने बोलायाला सुरुवात केली. मात्र, माझ्या आजीने कोणत्याही किमतीत स्वाभिमान टिकविण्याचे शिकविले होते. ही शिकवण माझ्यासोबत आजही राहिल्याचे रतन टाटा यांनी सांगितले.
![courtesy - Humans of Bombay Page](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/6059511_tataa.jpg)
हेही वाचा-खूशखबर! फास्टॅगचे शुल्क १५ दिवस माफ;२९ फेब्रुवारी शेवटची मुदत
मला आजही आठवते, दुसऱ्या महायुद्धानंतर तिने मला व माझ्या भावाला सुट्ट्यांसाठी लंडनला नेले होते. तिथेही शिकवणीला खरोखर तडा गेला नाही. ती कधीही 'हे नाही' अथवा 'त्याविषयी गप्प बसा' अशी म्हणाली नाही. जिथेही असेल तिथे स्वाभिमान हा सर्वांहून मोठा, असे तिने आमच्या मनात खऱ्या अर्थाने रुजवले, असे सांगत रतन टाटा यांनी आठवणीला उजाळा दिला.
हेही वाचा-'कोरोनाने भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी'
रतन टाटा यांनी नुकतेच इन्स्टाग्रामवर जमिनीवर बसलेला फोटो शेअर केला होता. त्याला दहा लाख लोकांहून अधिक लोकांनी पसंती दाखविली होती. त्यांच्या साधेपणाचे आणि चांगल्या मुल्यांचे अनेक वापरकर्त्यांनी कौतुकही केले आहे.