मुंबई - सरकारी बँका बुडित कर्जाच्या डोंगराखाली दबत असताना सत्ताधारी पक्षाचे नेतेही एनपीएला जबाबदार ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबई भाजप युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कंभोज याला बँक ऑफ बडोदाने कर्जबुडवा घोषित घेले आहे.
बँके ऑफ बडोदाने कंबोज याचा फोटो वर्तमानपत्रातील जाहिरातीत प्रसिद्ध केला आहे. त्यात म्हटले आहे, मोहित भारतीय हा कर्जबुडवा म्हणून घोषित करण्यात आला आहे. त्याने अव्यान ओर्नामेंटस फर्मशी संबंधित कर्ज घेतले आहे. बँकेने ही माहिती वर्तमानपत्रातील जाहिरातीमधून दिली आहे.
आरबीआयच्या नियमानुसार कंबोज आणि जितेंद्र कपूर यांना कर्जबुडवा जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे यापूर्वी बँक ऑफ बडोदाने म्हटले होते.
कर्ज थकबाकी नसल्याचा कंभोजने केला दावा-
संबंधित कंपनीचा संचालक नसल्याचे ३५ वर्षीय कंभोजने म्हटले आहे. कर्जाला जामिन देल्याने गेल्या दोन वर्षात जबाबदारी म्हणून ७६ कोटी भरल्याचा त्याने दावा केला आहे. पुढे त्याने म्हटले आहे, की त्याबाबतचा खटला २०१४ मध्ये न्यायालयात गेला होता. त्यामध्ये कर्ज घेणाऱ्याच्या बाजूने निकाल होता, असे त्याने दावा केला. कोणतीही थकबाकी नसल्याचेही त्याने पत्रात म्हटले आहे. कंभोज हा भाजपच्या युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून नोव्हेंबर २०१६ पासून काम करत आहे.
नावाशेवटी भारतीय लावल्याने हा कंबोज यापूर्वी चर्चेत आला होता. त्यासंदर्भातील नावातील बदलाची कंभोजने वर्तमानपत्रात जाहिरात दिली होती. बँकेने कर्जबुडवा घोषित केल्यानंतर त्याने नावात का बदल केला होता, याबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.