ETV Bharat / business

मदर डेअरीचे दूध प्रतिलिटर २ रुपयांनी महाग

author img

By

Published : Sep 6, 2019, 1:02 PM IST

मदर डेअरीकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर दिला जात आहे. त्यामुळे कंपनीने दुधाचे दर वाढविले होते. मदर डेअरीने गेल्या दोन-तीन महिन्यात शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर २.५० रुपये ३ रुपयांनी भाव वाढवून दिला होता.

संग्रहित - मदर डेअरी

नवी दिल्ली - राजधानीत ग्राहकांना दूध दरवाढीला सामोरे जावे लागणार आहे. शहरामधील प्रमुख दूध पुरवठादारापैकी एक असलेल्या मदर डेअरीने प्रतिलिटर २ रुपयांनी दर वाढविले आहेत. त्यामुळे दुधाची प्रतिलिटर ४४ रुपये किंमत होणार आहे.

मदर डेअरीकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर दिला जात आहे. त्यामुळे कंपनीने दुधाचे दर वाढविले होते. गेल्या दोन-तीन महिन्यात शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर २.५० रुपये ३ रुपयांनी भाव वाढवून दिला होता. त्यामुळे दुधाचे दर वाढविण्यात आल्याचे मदर डेअरीच्या प्रवक्त्याने सांगितले. हे दर आजपासून लागू होणार आहेत.

हेही वाचा-मारुतीचे हरियाणाच्या प्रकल्पामधील २ दोन दिवस उत्पादन राहणार बंद

ग्राहकांना अर्धा लिटरसाठी २३ रुपये तर १ लिटरसाठी ४४ रुपये मोजावे लागणार आहेत. इतर मिलीलिटरच्या दूध दरात बदल होणार नसल्याचे कंपनीने म्हटले आहे.

हेही वाचा-डिजीटल मीडियाने खासगी शिक्षकांना 'अच्छे दिन''; नोकऱ्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ

अमूलसह पराग मिल्कदेखील दुधाचे दर वाढविण्याची शक्यता-
मदर डेअरीने दर वाढविल्यानंतर इतर स्पर्धक कंपन्या अमूल आणि पराग मिल्ककडून दर वाढविले जाण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआर परिसरात मदर डेअरीकडून ३० लाख लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. मदर डेअरीने मे महिन्यात दुधाचा दर प्रति लिटर २ रुपयांनी वाढविला होता. गायीचे दुधाच्या दरात प्रति लिटरमध्ये बदल करण्यात आला नव्हता. मात्र अर्धा लिटरचे दूध हे १ रुपयांनी वाढविले होते.

हेही वाचा-दूरसंचार, वाहन उद्योग आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील नवीन नोकऱ्यांच्या संख्येत घट

Intro:Body:

NEWS

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.