ETV Bharat / business

धक्कादायक! वर्ष २०१८ मध्ये १२,९३६ बेरोजगारांच्या आत्महत्या - Union Ministry of Home Affairs

२०१८ मध्ये १२ हजार ९३६ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. १३ हजार १४९ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. कृषी क्षेत्रातील १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

committed suicide
आत्महत्या
author img

By

Published : Jan 18, 2020, 6:27 PM IST

Updated : Jan 18, 2020, 6:51 PM IST

नवी दिल्ली - २०१८ मध्ये रोज सरासरी ३५ बेरोजगार आणि स्वयंरोजगार असलेल्या ३६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. ही माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोने (एनसीआरबी) अहवालात दिली आहे.

२०१८ मध्ये १२ हजार ९३६ बेरोजगारांनी आत्महत्या केल्या आहेत. तर १३ हजार १४९ स्वयंरोजगार असलेल्या व्यक्तींनी आत्महत्या केल्या आहेत. तर कृषी क्षेत्रातील १० हजार ३४९ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१८ मध्ये एकूण १ लाख ३४ हजार ५१६ जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २०१७ च्या तुलनेत वर्ष २०१८ मध्ये आत्महत्येचे प्रमाण हे ३.६ टक्क्यांनी वाढले आहेत.

हेही वाचा-वृत्तवाहिन्याच्या संघटनेने केंद्रीय अर्थमंत्र्यांची घेतली भेट, 'ही' केली मागणी

एनसीआरबी ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्था आहे. ही संस्था गुन्ह्यांच्या नोदींची आकडेवारी गोळा करते. तज्ज्ञांच्या मतानुसार, आत्महत्या हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चिंताजनक प्रश्न आहे. मात्र, वेळेवर कार्यवाही केल्याने आत्महत्येच्या प्रश्नावर मात करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Intro:Body:

Dummy Business news

Conclusion:
Last Updated : Jan 18, 2020, 6:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.