ETV Bharat / business

कोरोनाच्या भीतीचे सावट; स्पेनमधील 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस २०२०' रद्द - कोरोना

जीएसएम २००६ पासून दरवर्षी स्पेनमधील बार्सेलोनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यामध्ये विविध देशांची सरकार, मंत्री, धोरणकर्ते, ऑपरेटर्स आणि मोठे उद्योजक कार्यक्रमाला हजेरी लावतात. दूरसंचार क्षेत्रातील विकास आणि तंत्रज्ञानावर कार्यक्रमावर चर्चा करण्यात येते.

File photo
संग्रहित
author img

By

Published : Feb 13, 2020, 2:37 PM IST

लंडन - कोरोनाचा फटका जागतिक दूरसंचार उद्योगाची संस्था जीएसएमला बसला आहे. 'मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2020' हे स्पेनमध्ये होणारे दूरसंचार क्षेत्राचा सर्वात मोठा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोना रोग चीनमधून इतर देशामध्ये पसरत आहे. अशा स्थितीत आरोग्याच्या सुरक्षिततेबाबत चिंता वाटत असल्याने मोबाईल वर्ल्ड काँग्रेस रद्द करण्यात आली आहे.

जीएसएम २००६ पासून दरवर्षी स्पेनमधील बार्सेलोनामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. यामध्ये विविध देशांची सरकार, मंत्री, धोरणकर्ते, ऑपरेटर्स आणि मोठे उद्योजक कार्यक्रमाला हजेरी लावतात. दूरसंचार क्षेत्रातील विकास आणि तंत्रज्ञानावर कार्यक्रमावर चर्चा करण्यात येते.

हेही वाचा-खूशखबर! फास्टॅगचे शुल्क १५ दिवस माफ;२९ फेब्रुवारी शेवटची मुदत

बार्सेलोना आणि स्पेनमधील वातावरण आरोग्यदायी आणि सुरक्षित राहण्यासाठी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोरोनामुळे जगभरात प्रवास करताना चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशा स्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करणे अशक्य झाल्याचे जीएसएमएने म्हटले आहे. कार्यक्रमाचे प्रायोजकत्व दिलेल्या कंपन्यांनी कार्यक्रमातून माघार घेतली आहे. यामध्ये व्होडाफोन, सिस्को, एलजी, व्हिवो, एनटीटी डोकोमो, सोनी, अॅमेझॉन, फेसबुक, मेडियाटेक, इंटेल आणि एनव्हिडिया यांचा समावेश आहे. चीनमधील कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींबाबत सहानुभूती असल्याचे जीएसएमएने म्हटले आहे.

हेही वाचा-'कोरोनाने भारताला निर्यातीचा विस्तार करण्याची संधी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.