सिडनी - गुगलसारख्या डिजीटल माध्यमांना बातम्यांसाठी शुल्क लागू करणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या कायद्याचे मायक्रोसॉफ्टने समर्थन केले आहे. गुगलवरील डाटा बिंग या सर्च इंजिनवर आणण्यासाटी लघू उद्योजकांना मदत करण्याचीही मायक्रोसॉफ्टने तयारी दर्शविली आहे.
मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष ब्रॅड स्मिथ म्हणाले की, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट्ट मॉर्रिसन आणि दूरसंचार मंत्री पॉल फ्लेचर यांच्याशी ऑनलाईन चर्चा केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यूज मीडिया बार्गेनिंग विधेयकाला मायक्रोसॉफ्टचे पूर्ण समर्थन असल्याचे या ऑनलाईन चर्चेत सांगण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाने न्यूज मीडियाबाबत विधेयक आणल्यास ऑस्ट्रेलियामधून सर्च इंजिन बंद करण्याचा गुगलने इशारा दिला होता. त्यावर ऑस्ट्रेलियाने गुगलच्या जागी मायक्रोसॉफ्टच्या मालकीचे बिंग हे सर्च इंजिन वापरण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. याबाबत माहिती देताना मॉर्रिसन म्हणाले की, सध्याचे विधेयक हे डिजीटल इकोसिस्टिममध्ये ग्राहक, उद्योग आणि समाजामध्ये समानता आणण्यासाठी मुलभूत पाऊल आहे.
हेही वाचा-शेअर बाजार गुंतवणुकदारांच्या संपत्तीत ३ दिवसांत १२.३१ लाख कोटींची भर
जर ऑस्ट्रेलियन नागरिकांचा आदर ठेवत असाल तरच गुगल आणि फेसबुकचे नेटवर्कमध्ये वर्चस्व राहिल, असा इशारा ऑस्ट्रेलियामधील थिंक टँकचे संचालक पीटर लूईस यांनी दिला आहे.
हेही वाचा-'बंदी लागू केलेल्या चिनी अॅपकडून भारतीयांचा डाटा मिळवा'
दरम्यान, गुगलने स्थानिक माध्यमांना बातम्यांसाठी पैसे द्यावेत, असा ऑस्ट्रेलियन सरकारचा दबाव आहे. मात्र, गुगलने ऑस्ट्रेलियाच्या सरकारला जुमानले नाही. त्यामुळे हा वाद वाढला आहे.