नवी दिल्ली – इंटरनेट एक्स्प्लोअर 11 (आयई 11) वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंटरनेटचे हे व्हर्जन वापरणाऱ्यांना मायक्रोसॉफ्टकडून 365 अॅप्स आणि त्यांची सेवा 2021 पर्यंत बंद करण्यात येणार आहे.
मायक्रोसॉफ्ट टीम वेब अॅपकडून चालू वर्षातील 30 नोव्हेंबरपासून आयई 11 ची सेवा देण्यात येणार नाही. तर 365 अॅपसाठी सेवा ऑगस्ट 2021 नंतर बंद करण्यात येणार आहे.
अनेक ग्राहक हे 2013 पासून आयई 11 वापरत आहेत. सध्याच्या काळात हे इंटरनेटची खूप कमी सुविधा असणारे व्हर्जन आहे. मायक्रोसॉफ्ट एज लेगसी डेस्कटॉप अॅपचे सुरक्षेचे अपडेट हे 9 मार्च 2021 नंतर देण्यात येणार नाही.