नवी दिल्ली - मायक्रोफायनान्सचे कर्ज माफ झाल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. हे रोखण्यासाठी पावले उचलावीत, अशी विनंती सत्या मॉडेल कॅपिट कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विवेक तिवारी यांनी सरकारला केली आहे.
मायक्रोफायनान्स क्षेत्र हे कोरोनाच्या संकटात नव्या समस्यांना सामोरे जात असल्याचे विवेक तिवारी यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, की काही समाजकंटकांकडून कर्ज माफ झाल्याची अफवा लोकांमध्ये पसरविली जात आहे. काही जण सदस्यत्व देण्याच्या नावाखाली लोकांकडून ५०० ते १ हजार घेत आहेत. हे निष्काळजी लोक कर्जमाफी करण्यासाठी मोहीम सुरू करणार असल्याचा दावा करतात. मात्र, गोळा केलेले पैसे हे वैयक्तिक लाभासाठी वापरतात. अनेक लोक क्रेडिट स्कोअरबाबत दक्ष आहेत. त्यामुळे ते थापांना बळी पडत नाहीत. पंजाबमध्ये चुकीची माहिती पसरवूनही ८० टक्के लोकांना मायक्रोफायनान्सचा हप्ता भरला आहे. हे खरोखरच सकारात्मक आहे.
हेही वाचा-जिओपाठोपाठ एअरटेलचा अमर्यादित ब्रॉडबँड प्लॅन जाहीर; 'या' मिळणार सुविधा
अफवांचा विषय हा संवेदनशील आहे. सरकारने अशा फसवणूक करणाऱ्या लोकांविरोधात कारवाई करावी. मायक्रो फायनान्स संस्थांसाठी सरकारने दोन तक्रार निवारण विभाग सुरू करावेत. त्यामधून त्यांच्या प्रश्नांचा निपटारा करावा, असा सल्ला तिवारी यांनी दिला.
हेही वाचा-'भारताच्या जीडीपीतील घसरण ही प्रत्येकासाठी धोक्याची घंटा'
निष्काळजी लोकांच्या दाव्याला बळी पडणार आहेत, ते दुर्दैवाने विश्वार्सहता गमाविणार आहेत. ते अफवांना बळी पडल्याने त्यांच्या संपूर्ण व्यवसायिक भांडवलावर परिणाम होणार आहे. ते आदर गमावून कर्जाची मूलभूत पात्रता गमाविणार आहेत. तसेच उद्योगाचा विकास करू शकणार नाहीत, असे असे विवेक तिवारी यांनी सांगितले.