ETV Bharat / business

उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचे 'मुख्यमंत्र्यांकडून उद्योगपतींना आश्वासन' - रतन टाटा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत, असे उद्योगपतींना आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर परराज्यातील उद्योग हे गुंतवणूक करण्यासाठी राज्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना बैठकीत सांगितले.

Uddhav Thackeray in meeting
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठकीत
author img

By

Published : Jan 8, 2020, 8:06 PM IST

मुंबई - राज्यातील आघाडीच्या उद्योगपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योगस्नेही वातावरण तयार करण्याचे आश्वासन दिल्याचे हिदुंजा ग्रुपचे उपाध्यक्ष गोपीचंद हिंदुजा यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील उद्योग परराज्यात जाणार नाहीत, असे उद्योगपतींना आश्वासन दिले. एवढेच नव्हे तर परराज्यातील उद्योग हे गुंतवणूक करण्यासाठी राज्यात येतील, असेही मुख्यमंत्र्यांनी उद्योगपतींना बैठकीत सांगितले. मुख्यमंत्र्यांनी तयार केलेल्या ब्ल्यूप्रिंटमध्ये औद्योगिक प्रकल्प, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा, रोजगार निर्मिती वाढविण्यासाठी पर्यटनाला प्रोत्साहन, उद्योगानूकलता वाढविण्यासाठी धोरणस्नेही प्रशासन या गोष्टींचा समावेश आहे.

गोपीचंद हिंदुजा म्हणाले, मुख्यमंत्र्यांबरोबरील भेट ही खऱ्या अर्थाने संस्मरणीय होती. राज्य १ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था होवू शकते, असे व्हिजन आणि रोडमॅपमधून दिसून येते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी डॉलरची होण्याचे उद्दिष्ट पूर्ण करू शकेल, असा विश्वास हिंदुजा यांनी व्यक्त केला.

पुढे हिंदुजा म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी सर्वात मोठा उद्योगस्नेही संदेश दिला. ते म्हणजे , हे आपले स्वत:चे सरकार असल्याचे त्यांनी उद्योगपतींना सांगितले. सरकार तुमचे म्हणणे ऐकणार असल्याचे ठाकरेंनी उद्योगपतींना सांगितले.

हेही वाचा-इराणने अमेरिकन सैन्यतळावर हल्ला केल्यानंतर शेअर बाजारात अस्थिरता

हे उद्योगपती बैठकीला होते उपस्थित-
रतन टाटा, उदय कोटक, आनंद महिंद्र, मुकेश अंबानी, हर्ष गोयंका, मानसी किर्लोस्कर, अशोक हिंदुजा, निरंजन हिरानंदानी, बाबा कल्याणी, गौतम सिंघानिया, दीपक पारेख आदी उद्योगपती या बैठकीला उपस्थित होते.

Intro:Body:

dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.