नवी दिल्ली – जागतिक डिजिटल देयक व्यवहार कंपनी मास्टरकार्डने देशातील लघू व मध्यम व्यावसायिकांना 250 कोटींची मदत करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे जाहीर केले आहे. त्यामधून व्यावसायिक हे कोरोनाच्या परिणामांमधून सावरू शकणार असल्याचे व्यापाऱ्यांची संघटना सीएआयटीने म्हटले आहे.
मास्टरकार्ड आणि अखिल भारतीय संघटनेने (सीएआयटी) डिजिटल देयक व्यहार आणि व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी भागीदारी केली आहे. यामधून कोरोनाच्या संकटाचा परिणाम झाला असताना व्यापाऱ्यांना सावरण्यास मदत होणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी मदत केली जाणार असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे.
दक्षिण आशियाचे प्रमुख पोरुष सिंह म्हणाले, की डिजिटल देयक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने व्यापाऱ्यांच्या उत्पन्नात एक तृतीयांश वाढ होवू शकते. सीएआयटीचे महासचिव प्रविण खंडेलवाल म्हणाले, की टाळेबंदीत 90 टक्क्यांहून अधिक लहान आणि मध्यम व्यवसाय बंद पडले आहेत. अशा परिस्थितीत दुकानदार व व्यावसायिक हे ऑनलाईन व्यवसाय करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.