ETV Bharat / business

सुवर्णकामगिरी करणाऱ्या नीरज चोप्राला एक्सयूव्ही 700 मिळणार भेट, महिंद्रांनी केले ट्विट - olympics gold medal india

नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले आहे. एका वापरकर्त्याने महिंद्रा यांना उद्देशून चोप्रा याला एक्सयूव्ही 700 देणार का, असे विचारले. त्यावर आनंद महिंद्रा यांनी लगेच उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की हो, खरोखर. आमच्या गोल्डन अॅथिलिटला एक्सयू्ही 700 भेट देणे हा माझ्यासाठी बहुमान असणार आहे.

नीरज चोप्रा आनंद महिंद्रा
नीरज चोप्रा आनंद महिंद्रा
author img

By

Published : Aug 7, 2021, 10:39 PM IST

Updated : Aug 7, 2021, 10:56 PM IST

नवी दिल्ली - महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे नेहमीच ट्विटमुळे चर्चेत असतात. सध्या, ते ऑलिम्पिक विजेत्याला देण्यात येणाऱ्या गिफ्टमुळे चर्चेत आले आहेत. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला महिंद्रा यांनी एक्स यूव्ही 700 गिफ्ट देऊ केली आहे. याबाबतचे त्यांनी ट्विट केले आहे.

नीरज चोप्राने भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले आहे. एका वापरकर्त्याने महिंद्रा यांना उद्देशून चोप्रा याला एक्सयूव्ही 700 देणार का, असे विचारले. त्यावर आनंद महिंद्रा यांनी लगेच उत्तर दिले. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की हो, खरोखर. आमच्या गोल्डन अॅथिलिटला एक्सयू्ही 700 भेट देणे हा माझ्यासाठी बहुमान असणार आहे. त्यांनी हे ट्विट महिंद्रा अँड महिंद्राचे कार्यकारी संचालक राजेश जेजुरीकर आणि कंपनीचे सीईओ विजय नक्रा यांना टॅग केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक वाहन त्याच्यासाठी तयार ठेवा, असे म्हटले आहे.

आनंद महिंद्रांचे ट्वविट
आनंद महिंद्रांचे ट्वविट

हेही वाचा-नीरज, तू देशाचं स्वप्न पूर्ण केलं, धन्यवाद..! अभिनव बिंद्राचं ट्विट

जेव्हेलिन भालाफेकचे प्रतिक असलेल्या नाण्याचा फोटो ट्विट केला आहे. अशा प्रकारचे नाणे नीरज चोप्रासाठी काढावे, अशी अपेक्षा त्यांनी केले. हे ट्विट त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांना टॅग केले आहे.

आनंद महिंद्रांचे ट्विट
आनंद महिंद्रांचे ट्विट

भारतीय अॅथलिट नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. नीरजने भालाफेक स्पर्धेमध्ये भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिलं सुवर्ण पदक जिंकलं. पात्रता फेरीत नीरजची कामगिरी शानदार होती आणि त्याने अॅथलिटमध्ये 121 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. नीरजने अंतिम सामन्यात पहिला थ्रो 87.03 मीटर केला. तर दुसरा थ्रो त्याने 87.58 मीटर करत सुवर्ण पदक निश्चित केलं.

हेही वाचा-Tokyo Olympics: भारताचे राष्ट्रगीत ऐकताच नीरज चोप्रा झाला भावूक, व्हिडिओ होतोय व्हायरल

नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास

नीरजने पात्रता फेरीत आपल्या कामगिरीने खळबळ उडवून दिली होती. त्याने 86.65 मीटर थ्रो करत ग्रु ए मध्ये अव्वलस्थान पटकावले होते. नीरजने याआधी अशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल आणि आशियाई चॅम्पियनशीपमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची नजर त्याच्या कामगिरी होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे हे पहिल सुवर्ण पदक आहे. आता ऑलिम्पिकमधील पदकाची संख्या 7 इतकी झाली झाली आहे. यात 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कास्य पदक आहेत.

हेही वाचा-नीरज चोप्राला 6 कोटी, तर बजरंग पुनियाला मिळणार 2.5 कोटी! हरियाणा सरकारची घोषणा

नीरज भारताकडून ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारा दुसरा खेळाडू ठरला. याआधी 2008 मध्ये अभिनव ब्रिंदा याने नेमबाजीत भारताला सुवर्ण पदक जिंकून दिलं होतं. अॅथलेटिक्समध्ये भारताचे हे पहिलं सुवर्ण पदक आहे आणि यासह 23 वर्षीय नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. नीरजने पहिल्या दोन थ्रो मध्येच सुवर्ण पदक पक्के केलं. इतर अॅथलिट यांनी खूप प्रयत्न केलं. पण नीरजचा 87.58 मीटर थ्रो पार ते करु शकले नाहीत.

Last Updated : Aug 7, 2021, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.