नवी दिल्ली - केंद्र सरकारने 'मेक इन इंडिया'च्या मोहिमेंतर्गत स्वदेशी बनावटीचे व्हेटिंलेटर रुग्णालयांना पुरवविण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्र सरकारने 3 हजार व्हेटिंलेटर विविध राज्यांना वितरित केली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशात 75 हजार व्हेटिंलेटर जून अखेरील लागणार असल्याचा अंदाज केला होता. त्याची पूर्तता करण्याकरता व राज्यांच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी सरकारने घाईने व्हेंटिलेटर पुरवण्याचे कंपन्यांना आदेश दिले होते. सरकारमधील सूत्राने सांगितले, की येत्या काही दिवसात व्हेटिंलेटरचे उत्पादन वेगाने वाढणार आहे. स्थानिक उत्पादक निश्चित करण्यात आले आहेत. त्यांना व्हेटिंलेटरच्या उत्पादनासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासाठी नवीन पुरवठा साखळी तयार करण्यात आली आहे. स्कार्नयबरोबर भागीदारी असलेली भारत इलेक्ट्रॉनिक्सला 30 हजार व्हेटिंलेटरचा पुरवठा करण्याचे काम दिले आहे. त्याशिवाय मारुती सुझुकी, ज्योती सीएनसी, एपी मेडटेक झोनलाही व्हेटिंलेटर पुरवठ्याचे काम दिल्याचे सूत्राने सांगितले. केंद्रीय विदेश मंत्रालय हे चीनमधील पुरवठादारांकडून 10 हजार व्हेटिंलेटर मागविण्यासाठी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या रुग्णांना श्वसनाला अडथळा होत असताना जीव वाचविण्याकरता व्हेटिंलेटरची मदत होते.