नवी दिल्ली - एकाच महिन्यात फेब्रुवारीमध्ये चौथ्यांदा गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. स्वयंपाक घरातील गॅस आणखी २५ रुपयांनी महागला आहे. यामध्ये अनुदानित, बिगरअनुदानित आणि उज्जवला योजनेतील लाभार्थ्याला देण्यात येणाऱ्या गॅस सिलिंडरचा समावेश आहे.
दरवाढीनंतर दिल्लीत १४.२ किलो गॅस सिलिंडरची किंमत ८१९ रुपये आहे. तर रविवारी या गॅस सिलिंडरची किंमत ८१९ रुपये होती.
हेही वाचा-जीएसटीचे संकलन फेब्रुवारीत ७ टक्क्यांनी अधिक; ओलांडला १ लाख कोटींचा टप्पा
- आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना विमान इंधनाचे दरही ६.५ टक्क्यांनी वाढले आहेत.
- यापूर्वी एलपीजी सिलिंडरचे दर ४ फेब्रुवारीला २५ रुपये, १५ फेब्रुवारीला ५० रुपये तर २५ फेब्रुवारीला २५ रुपयांनी वाढले आहेत.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढत असताना डिसेंबरपासून गॅस सिलिंडरचे दर १७५ रुपयांनी वाढले आहेत.
- जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढून प्रति बॅरल ६५.४९ डॉलर आहेत.
- कोरोनाविरोधातील लसीकरण जगभरात सुरू असताना कच्च्या तेलाची जगभरात मागणी वाढत आहे.
हेही वाचा-घराचे स्वप्न साकारणे सुलभ; स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात
महानगरांमध्ये बाजार भावाप्रमाणे खरेदी करावा लागतो गॅस सिलिंडर
एलपीजीचे दर संपूर्ण देशात एकच आहेत. मात्र, सरकारकडून काही प्रमाणात ग्राहकांना अनुदान देण्यात येते. काही वर्षांत महानगर आणि मोठ्या शहरांमध्ये गॅस सिलिंडरवरील अनुदान काढण्यात आले आहे.
दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने नवा उच्चांक गाठला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग दुसऱ्या दिवशी स्थिर राहिल्या आहेत.