मुंबई - कोटक महिंद्रा बँकेने (केएमबी) बचत ठेवीवरील व्याजदरात ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. गेल्या महिन्यात केएमबीने ठेवीवरील व्याजदरात दोनदा कपात केली होती.
ज्या बचत खात्यावर १ लाख रुपये आहेत, त्या केएमबीच्या खातेदारांना ४.५० टक्क्याऐवजी ४ टक्के व्याजदर मिळणार आहे. तर १ लाखांहून कमी रक्कम बचत खात्यावर असणाऱ्या खातेदारांना ३.५० टक्के व्याजदर मिळणार आहे. हे बदलले व्याजदर देशात राहणाऱ्या ठेवीदारांसाठी लागू असणार आहेत.
हेही वाचा-धक्कादायक! कोरोनच्या संकटाने 'या' क्षेत्रातील ४० टक्के कंपन्या पूर्णपणे बंद पडणार
स्टेट बँक ऑफ इंडियाकडून बचत खात्यावरील ठेवीवर २.७५ टक्के व्याज देण्यात येत आहे. येस बँकेसह इतर खासगी बँकांकडून येत्या काळात व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-सुस्साट! हजार एचडी चित्रपट सेकंदात डाऊनलोड करणारी चिप विकसित
दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने कर्जदाराला मार्च ते ऑगस्ट अशी सहा महिन्यांची कर्जफेडीसाठी मुदत दिली आहे. त्याचा बँकिंग क्षेत्रावर परिणाम होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.