नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने टाळाबंदीच्या दुसऱ्या टप्प्यात नवे नियम लागू केले आहेत. यामध्ये सर्वप्रकारच्या सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालयांसह इतर सार्वजनिक स्थळे सुरू करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
जाणून घ्या कोणते व्यवसाय आणि आर्थिक चलनवलन सुरू राहणार
हेही वाचा-कोरोनाच्या संकटात इंग्लंडला भारताने 'अशी' केली मदत
- सर्व कृषी आणि रोपवाटिकांची कामे पूर्णपणे सुरू राहणार आहेत. यामध्ये शेतीकामे, मत्स्योद्योग, रोपांची लागवड आणि पशुसंवर्वधन यांचा समावेश आहे.
- भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि आरबीआयने परवानगी दिलेल्या वित्तिय बाजारपेठा
- थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत बँक शाखांमधील कामकाज हे नेहमीच्या वेळेप्रमाणे सुरू राहणार आहे.
- भांडवली आणि इतर बाजारपेठांच्या सेवा, विमा कंपन्या
- मनरेगातून करण्यात येणारी जलसंवर्धनाची कामे आणि जलसिंचनाची कामे
- पेट्रोल,डिझेल, एलपीजी आणि सीएनजीची वाहतूकॉदूरसंचार आणि इंटरनेट सेवांचे कामकाज
- रेल्वे, विमानतळ आणि जमिनीवरील बंदर या ठिकाणी मालवाहतूक आणि ट्रकची वाहतूक सुरू राहणार
- दुकाने, किराणा आणि फळे, पालेभाज्या विक्री करणारी दुकाने.
- आयटी आणि आयटीशी निगडीत सेवा देणाऱ्या कंपन्यांना ५० टक्के मनुष्यबळावर कामकाज सुरू करण्याची परवानगी
- ई-कॉमर्स कंपनी
- कुरियर सेवा
- कोल्ड स्टोअरेज आणि गोडाऊन सेवा
- खासगी सुरक्षा सेवा
- इलेक्ट्रिशियन, आयटी रिपेअर, प्लंबर, मोटर मॅकनिक्स आणि कारपेंटर
- ग्रामीण भागातील उद्योग
- विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) उत्पादन आणि उद्योग. निर्यातक्षम उद्योग, औद्योगिक वसाहतीमधील उद्योग
- ग्रामीण भागातील अन्नप्रक्रिया उद्योग
- खाणकामाचे उद्योग
- पॅकेजिंग उत्पादनांचे उद्योग
- ग्रामीण भागातील वीटभट्ट्या
- ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे, जलसंवर्धनाचे प्रकल्प, इमारतींचे बांधकाम यांना परवानगी
- औद्योगिक वसाहतीमधील सर्व प्रकल्प सुरू करण्याची परवानगी
- महानगरपालिका आणि नगरपरिषदेमधील बांधकामांना परवानगी. मात्र, ज्या प्रकल्पांमध्ये बाहेरून कामगार आणावे लागणार नाहीत, अशाच प्रकल्पांना परवानगी
(ही बातमी सतत अपडेट होत आहे.)
हेही वाचा-शेअर बाजाराची ६०० अंशांनी उसळी; 'या' कंपन्यांचे वधारले शेअर