ETV Bharat / business

'ही' बहुराष्ट्रीय कंपनी भारतात २ हजार जणांना देणार नोकऱ्या - रेरा

जेएलएल इंडियाचे प्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर म्हणाले, 'भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रामधील जागांची विशेषत: कार्यालयाच्या जागांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपनीच्या उलाढालीत वाढ झाली आहे.'

प्रतिकात्मक
author img

By

Published : Jul 28, 2019, 3:51 PM IST

नवी दिल्ली - स्थावर मालमत्ता क्षेत्रात मंदीचे चित्र आहे. अशा स्थितीमध्ये प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनी जेएलएल इंडियाच्या उलाढालीत १७ टक्क्याने वाढ होवून ४ हजार कोटीपर्यंत पोहोचली आहे. ही कंपनी पुढील वर्षापर्यंत २ हजार जणांना नोकऱ्या देणार आहे.

जेएलएल इंडियामध्ये ११ हजार ५०० लोक कार्यरत आहेत. तर कपंनीचे देशातील १० मोठ्या शहरात कार्यालये आहेत. जेएलएल इंडियाचे प्रमुख तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश नायर म्हणाले, 'भारतीय स्थावर मालमत्ता क्षेत्रामधील जागांची विशेषत: कार्यालयाच्या जागांची मागणी वाढली आहे. ही मागणी गुंतवणूकदार आणि वापरकर्ते या दोन्हींकडून वाढली आहे. त्यामुळे कंपनीच्या उलाढालीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.'

चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कर्मचाऱ्यांची संख्या ११ हजार ५०० होणार आहे. तर पुढील वर्षाखेर कर्मचाऱ्यांची संख्या ही १३ हजार ते १३ हजार ५०० होईल, असे ते म्हणाले. रहिवाशी मालमत्तेची विक्री आणि ताबा देण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. रेरा, बेनामी पैसे हस्तांतरण कायद्यातील सुधारणा आणि जीएसटीच्या अंमलबजावणीने घर खरेदी करणाऱ्यांचा विश्वास वाढला आहे. दर्जेदार आणि तयार असलेल्या कार्यालयांना खूप मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

जेएलएल चा 'फॉर्च्युअन ५००' कंपनीत समावेश आहे. या कंपनीची जगात १६.३ अब्ज डॉलरची उलाढाल आहे. तर कंपनी जगभरातील ८० देशामध्ये कार्यरत आहे.

Intro:Body:

business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.