मौल्यवान खड्यांसह दागिन्यांच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये ५.४९ टक्के घसरण - जीजेईपीसी
चालू वर्षात ऑक्टोबरमध्ये २४ हजार ५८३ कोटी १९ लाख रुपयांचे मौल्यवान खडे आणि दागिन्यांची निर्यात झाली आहे. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये २६ हजार १० कोटी ८७ लाख रुपयांच्या दागिन्यांची निर्यात झाली होती. ही आकेडवारी मौल्यवान खडे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) दिली आहे.
मुंबई - मौल्यवान खडे आणि दागिन्यांच्या निर्यातीत ऑक्टोबरमध्ये ५.४९ टक्के घसरण झाली आहे. भौगोलिक स्थितीजन्य राजकीय तणावाचा परिणाम झाल्याने निर्यात घटल्याचे जीजेईपीसी संस्थेच्या आकडेवारीतून दिसून आले आहे.
चालू वर्षात ऑक्टोबरमध्ये २४ हजार ५८३ कोटी १९ लाख रुपयांचे मौल्यवान खडे आणि दागिन्यांची निर्यात झाली आहे. तर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये २६ हजार १० कोटी ८७ लाख रुपयांच्या दागिन्यांची निर्यात झाली होती. ही आकेडवारी मौल्यवान खडे आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेने (जीजेईपीसी) दिली आहे.
हेही वाचा-इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख यांच्यावर आणखी एका जागल्याचा निशाणा
अमेरिका-चीनमधील व्यापार युद्ध, हाँगकाँगमधील निदर्शने आणि मध्य पूर्वेत व्हॅटची अंमलबजावणी या कारणांनी निर्यात घटल्याचे जीजेईपीसीने म्हटले आहे. चीनबरोबर व्यापार युद्ध सुरूच राहिल्याने अमेरिकेच्या बाजारपेठेमधून दागिने आणि मौल्यवान खड्यांची मागणी कमी झाली आहे.
हेही वाचा-एमएसएमई उद्योगांच्या पत मानांकनाकरता धोरण तयार करण्याचे काम चालू - गडकरी
काय आहे जीजेईपीसी -
जीजेईपीसी हे मौल्यवान खडे आणि दागिने उद्योगाची वाणिज्य मंत्रालयाने स्थापन केलेली शिखर संस्था आहे. ही संस्था ६ हजार निर्यातदारांचे प्रतिनिधीत्व करते. जीजेईपीसी ही वाणिज्य मंत्रालयाने स्थापन केलेली संस्था आहे.
Dummy Business News
Conclusion: