ETV Bharat / business

देशातील 'या' प्रमुख उद्योजकांची अ‌ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी घेतली भेट

author img

By

Published : Jan 18, 2020, 12:40 PM IST

उद्योगपती मुकेश अंबानी आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची दक्षिण मुंबईमधील स्टार हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार, गोदरेज चेअरमनचे आदी गोदरेज, स्टँर्ड चार्टड बँकेचे झरीन दारुवाला, शिमोमी इंडियाचे प्रमुख मनू जैन, इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मुर्ती आदींचा समावेश होता.

Jeff Bezos
जेफ बेझोस

मुंबई - जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी शुक्रवारी आघाडीच्या उद्योजकांची मुंबईमध्ये भेट घेतली. यामध्ये गोदरेज ग्रुपचे चेअरमन आदी गोदरेज आणि रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी आदींचा समावेश आहे.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांची दक्षिण मुंबईमधील स्टार हॉटेलमध्ये भेट झाली. यावेळी एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार, गोदरेज चेअरमनचे आदी गोदरेज, स्टँर्ड चार्टड बँकेचे झरीन दारुवाला, शिमोमी इंडियाचे प्रमुख मनू जैन, इन्फोसिसचे सहसंस्थापक एन. आर. नारायण मुर्ती आदींचा समावेश होता. त्याचबरोबर बँक ऑफ अमेरिकाचे नखाते हेदेखील उपस्थित होते.

हेही वाचा-पियूष गोयल यांचा अ‌ॅमेझॉनच्या गुंतवणुकीवरून 'यू टर्न,' म्हणाले...

एफएमसीजी आणि किरकोळ विक्री व्यवसायातील फ्युच्युअर ग्रुपचे अध्यक्ष किशोर बियाणी, हिंदुस्थान लिव्हरचे संजीव मेहता, नेस्ले इंडियाचे सुरेश नारायण आणि प्रॉक्टर अँड गॅम्बलरचे मधूसुदन गोपालन आदी उपस्थित होते.

अॅमेझॉन इंडियाचे अमित अग्रवाल यांच्यासमवेत भारती एअरटेलचे सुनिल मित्तल हेदेखील उपस्थित होते. इन्फोसिसचे सलिल पारेख, एचबीसीचे सुरेंद्र रोशा आणि ओलाचे भावनीश अग्रवाल यांनीही जेफ बेझोस यांची भेट घेतली. सर्व उद्योजकांनी जेफ बेझोस यांच्याबरोबर एकत्रित फोटो काढला. बेझोस यांनी नवी दिल्लीमधील राजघाट येथे भेट दिली. तसेच गुरुवारी बॉलीवुडमधील सेलिब्रिटींची भेट घेतली.

हेही वाचा-देशातील अ‌ॅमेझॉन प्राईममध्ये दुप्पट गुंतवणूक करणार - जेफ बेझोस

जेफ बेझोस यांनी १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले. तसेच १० लाख जणांना २०२५ पर्यंत रोजगार देणार असल्याचे जाहीर केले आहे. बेझोस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट मिळू शकली नसल्याचे वृत्त आहे.

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.