नवी दिल्ली - Lantis समूहाचा एक भाग Jeep India आपली सात आसनी SUV 'जीप मेरिडियन' या वर्षाच्या मधल्या महिन्यात देशात लॉन्च करणार आहे. कंपनीने सोमवारी एका निवेदनात म्हटले आहे की, 'मेड इन इंडिया' जीप मेरिडियन ही देशातील पहिली सात-सीटर एसयूव्ही असेल. Stelantis India मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक रोलँड बाउचर, यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर जीप ब्रँड त्याच्या SUV क्षमतेमुळे ओळखला जातो. जीप मेरिडियनच्या माध्यमातून आम्हाला भारतातही न्यायची आहे.
भारतीय ग्राहकांच्या गरजेनुसार या वाहनाची खास रचना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जीप इंडियाचे प्रमुख निपुण जे महाजन म्हणाले की, कंपनीने काश्मीर ते कन्याकुमारी प्रवासात एसयूव्हीची सर्व प्रकारच्या भूप्रदेशात चाचणी केली आहे. जीपच्या कामगिरीची चाचणी घेण्यासाठी 5,000 किमी पेक्षा जास्त अंतर कापले गेले. या वाहनाची गुणवत्तेच्या विविध पॅरामीटर्सवर चाचणी घेण्यात आली आहे. कंपनीने सांगितले की हे वाहन 2022 च्या मध्यात लॉन्च केले जाईल. अजून याची किंमत सांगितली नाही.
हेही वाचा - Big action of SEBI: रिलायन्स होम फायनान्स, अनिल अंबानी आणि इतर तिघांवर बंदी