ETV Bharat / business

'जनऔषधी योजनेमुळे देशातील औषधांच्या विक्रीवर होणार २० टक्के परिणाम'

जनऔषधी योजनेतून जवळपास ५० ते ९० टक्के सवलतीच्या दरात नागरिकांना औषधे दिली जातात. ब्युरो ऑफ फार्मा पीएसयूएस ऑफ इंडियाकडून  (बीपीपीआय) जनऔषधी योजनेसाठी सुमारे ६ हजार कोटींचे औषधे आली आहेत.

प्रतिकात्मक
author img

By

Published : Mar 16, 2019, 8:02 PM IST

मुंबई - जनऔषधी योजनेतून नागरिकांना कमी दरात औषधे दिली जात आहेत. या योजनेमुळे फार्मा उद्योगाच्या औषध विक्रीवर २० टक्के परिणाम होणार असल्याचे एडेलवायझने म्हटले आहे. देशात सुमारे ५ हजार जनऔषधी दुकाने आहेत.

जनऔषधी योजनेतून जवळपास ५० ते ९० टक्के सवलतीच्या दरात नागरिकांना औषधे दिली जातात. ब्युरो ऑफ फार्मा पीएसयूएस ऑफ इंडियाकडून (बीपीपीआय) जनऔषधी योजनेसाठी सुमारे ६ हजार कोटींचे औषधे आली आहेत. याचा ब्रँडेड औषधांच्या व्यवसायावर २५ हजार ते ३० हजार कोटींचा फटका बसणार असल्याचे एडेलवायझच्या अहवालात म्हटले आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जनऔषधी दुकानातून १५० कोटींची विक्री झाली आहे. गतवर्षी २०१८ मध्ये १२० कोटींच्या जनऔषधींची विक्री झाली होती. ब्रँडेड नसलेल्या जेनरिक औषधांमुळे ब्रँडेड औषधांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. ब्रँडेड औषधांच्या कंपन्यांना जनऔषधींची दुकानेही आव्हान ठरत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. देशातील ५ हजार जनऔषधी दुकानातून सुमारे ८०० प्रकारची औषधे दिली जातात. केंद्र सरकारने २०२० पर्यंत २ हजार ५०० जनऔषधी दुकाने सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.

Intro:Body:

Jan Aushadhi scheme may disrupt domestic pharma market

'जनऔषधी योजनेमुळे देशातील औषधांच्या विक्रीवर होणार २० टक्के परिणाम'

मुंबई - जनऔषधी योजनेतून नागरिकांना कमी दरात औषधे दिली जात आहेत. या योजनेमुळे फार्मा उद्योगाच्या औषध विक्रीवर २० टक्के परिणाम होणार असल्याचे एडेलवायझने म्हटले आहे. देशात सुमारे ५ हजार जनऔषधी दुकाने आहेत. 

जनऔषधी योजनेतून जवळपास ५० ते ९० टक्के सवलतीच्या दरात नागरिकांना औषधे दिली जातात. ब्युरो ऑफ फार्मा पीएसयूएस ऑफ इंडियाकडून  (बीपीपीआय) जनऔषधी योजनेसाठी सुमारे ६ हजार कोटींचे औषधे आली आहेत. याचा ब्रँडेड औषधांच्या व्यवसायावर २५ हजार ते ३० हजार कोटींचा फटका बसणार असल्याचे एडेलवायझच्या अहवालात म्हटले आहे. 

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जनऔषधी दुकानातून १५० कोटींची विक्री झाली आहे. गतवर्षी २०१८ मध्ये १२० कोटींच्या जनऔषधींची विक्री झाली होती. ब्रँडेड नसलेल्या जेनरिक औषधांमुळे ब्रँडेड औषधांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.  ब्रँडेड औषधांच्या कंपन्यांना जनऔषधींची दुकानेही आव्हान ठरत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. 

देशातील ५ हजार जनऔषधी दुकानातून सुमारे ८०० प्रकारची औषधे दिली जातात. केंद्र सरकारने २०२० पर्यंत २ हजार ५०० जनऔषधी दुकाने सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.