जळगाव - कोरोनाच्या लढ्यात अत्यावश्यक असलेल्या एन-९५ मास्कची कमतरता आहे. त्या पार्श्वभूमीवर जळगावातील विद्यार्थ्यांनी थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करून मास्क तयार केला आहे. जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट व अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी 'थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क'चे डिझाईन तयार केले आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चेहऱ्याला मास्क लावणे सरकारने बंधनकारक केले आहे. हवेला न रोखणारा, श्वसन प्रक्रियेत अडथळा निर्माण न करणारा, समोरील व्यक्तीने शिंकताना उडणारे तुषार रोखणारा मास्क असला पहिजे. या सर्व बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी उपयुक्त ठरेल असा मास्क तयार केला आहे.
थ्रीडी प्रिंटिंग मशीनवर मास्कची निर्मिती-
मानवी चेहऱ्याची रचना लक्षात घेऊन थ्रीडी फेस मास्कची निर्मिती तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्कृष्ट दर्जाचे मास्क विद्यार्थ्यांनी तयार केले आहेत. एका थ्रीडी मास्कला बनवण्यासाठी ७० रुपये खर्च येतो. कोरोनापासून सुरक्षा देणाऱ्या या फेस मास्कचे डिझाइन सॉफ्टवेअरमध्ये मानवी चेहरा लक्षात घेऊन तयार करण्यात आले आहे. मास्कसाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून उच्च तंत्रज्ञानाने थ्रीडी प्रिंटिंग मशीनवर निर्मिती केली. या मास्कला लावण्यात आलेले हेपा फिल्टर हे ९९.९९६ टक्क्यांपर्यंत ०.३ मायक्रॉन व त्यापेक्षा मोठे कण अडवण्यासाठी उपयोगी ठरत ठरू शकते, असा विद्यार्थ्यांनी दावा केला आहे.
हेही वाचा-करवाढीची शिफारस करणाऱ्या 'त्या' महसूल अधिकाऱ्यांवर मोदी सरकारचे आरोपपत्र
विद्यार्थ्यांनी प्राचार्य डॉ. ए. जी. मॅथ्यू, डॉ. नितीश सिन्हा, प्रा. दत्तात्रय चोपडे यांच्या मार्गदर्शनात 'थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क'चे डिझाईन तयार केले आहे. हे मास्क लेखराज वाघ, सुशील महाजन, दामोदर जिवराजनी, शुभम सोनवणे व शिवम कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.
हेही वाचा-'अर्थव्यवस्था झोपण्यापासून वाचविण्याकरता तत्काळ सुधारणा करा'
कमी वेळेत तंत्रज्ञानाचा उपयोग करून फेस मास्कचे डिझाइन त्यांनी तयार केले आहे. हे थ्रीडी प्रिंटेड फेस मास्क सर्वांना उपयुक्त ठरणार आहेत. महाविद्यालयाने तयार केलेल्या मास्कबद्दल संस्थेचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला आहे.