नवी दिल्ली - प्राप्तिकर विभागाने एआयआयडीएमकेच्या नेत्या शशिकला यांची २ हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. प्राप्तिकर विभागाकडून ही आज कारवाई करण्यात आली आहे.
प्राप्तिकर विभागाने शशिकला यांची जप्त केलेली मालमत्ता तामिळनाडूमधील कोडानाड आणि सिरूवथूरमध्ये आहे. एआयआयडीएमकेने इडाप्पडी के. पलानीस्वामी यांची मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवड केली आहे. त्यामुळे पक्षातील नेतृत्वाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. अशातच प्राप्तिकर विभागाने एआयडीएमकेच्या नेत्या शशिकला यांच्यावर कारवाई केली आहे. शशिकला या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या निकटवर्तीय राहिल्या आहेत.
हेही वाचा-आरबीआय ९ ऑक्टोबरला जाहीर करणार पतधोरण; 'हा' आहे तज्ज्ञांचा अंदाज
यापूर्वी प्राप्तिकर विभागाने २०१७ मध्ये शशिकला व त्यांच्या जवळील व्यक्ती, कुटुंब यांच्याशी संबंधित असलेल्या १५० ठिकाणी छापे मारले होते.