ETV Bharat / business

आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवरील निर्बंधात 31 मेपर्यंत वाढ - DGCA circular on International flights

केंद्रीय नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवेवर निर्बंध लागू केले होते. त्यासाठी डीजीसीएने परिपत्रक काढून विमान कंपन्यांना आदेश दिले होते. या परिपत्रकात बदल करून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक निर्बंधात 31 मे रात्री 12 वाजून 59 मिनिटापर्यंत वाढ केली आहे.

International flights suspension
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक
author img

By

Published : Apr 30, 2021, 3:16 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना केंद्र सरकारने विमान सेवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सेवा ही 31 मे 2021 पर्यंत स्थगित केली आहे.

केंद्र सरकारने कोरोना आणि टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर 25 मार्च 2020 ला प्रवासी विमान वाहतुकीवर निर्बंध लागू केले होते. मात्र, देशांतर्गत विमान वाहतूक सेवा ही 25 मे रोजी सुरू केली होती. भारताने आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा बंद केली असली तरी एअर ट्रॅव्हल बबलच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवा सुरू असणार आहे.

हेही वाचा-धक्कादायक..! रेमडेसिवीरच्या बाटल्यांमध्ये सलाईनचे पाणी टाकून विक्री

केंद्रीय नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (डीजीसीए) कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी आंतरराष्ट्रीय वाहतूक सेवेवर निर्बंध लागू केले होते. त्यासाठी डीजीसीएने परिपत्रक काढून विमान कंपन्यांना आदेश दिले होते. या परिपत्रकात बदल करून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक निर्बंधात 31 मे रात्री 12 वाजून 59 मिनिटापर्यंत वाढ केली आहे. असे असले तरी आंतरराष्ट्रीय विमान माल वाहतूक आणि डीजीसीएने विशेष परवानगी दिलेल्या विमानांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू होणार नाहीत.

हेही वाचा-कोरोनाने गोकुळच्या तिसऱ्या ठरावधारकाचा मृत्यू

जगभरातून विविध देशांकडून विमानाने भारताला मदत

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये भारतात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशातील वैद्यकीय यंत्रणा अपुरी पडत असल्याचे जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर, जगभरातील कित्येक देश भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेने पाठवलेले वैद्यकीय साहित्य आज (शुक्रवार) सकाळी भारतात दाखल झाले आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणे, औषधींसह लसींचा समावेश आहे. तसेच, लस तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचाही यात समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, भारताने मदतीची कोणतीही मागणी न करताही आंतरराष्ट्रीय स्तरावरुन कित्येक देश मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.